Shilpa Bodkhe : 'ठाकरेंच्या शब्दाला किंमत नाही...', शिवसेना सोडताना शिल्पा बोडखे स्पष्टच बोलल्या
Shilpa Bodke Resignation Shiv Sena UBT : शिवसेनेत ठाकरेंच्या शब्दाला किंमत नाही आहे. तसेच शिवसेना भवनातून संघटन वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिल्पा बोडखे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिवसेना भवनातून षडयंत्र रचल्याचा आरोप
शिवसेना भवनातून संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न
शिल्पा बोडखे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र
Shilpa Bodke Resignation Shiv Sena UBT : आगामी लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भेटीगाठी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. असे असतानाच विदर्भातून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील ठाकरेंच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना भवनातून संघटन वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिल्पा बोडखे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. (Shilpa bodkhe resign from ubt shiv sena Uddhav thackeray spokesperson shiv sena vidarbh mahila agahdi)
ADVERTISEMENT
शिल्पा बोडखे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर शिवसेना पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. या संबंधित पत्र देखील त्यांनी शेअर केले आहे. नेमकं या पत्रात काय म्हटलंय हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : गुजरातला झटका! मोहम्मद शमी IPL 2024 मधून बाहेर
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र...
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa
हे वाचलं का?
शिल्पा बोडखेंचे ट्विट जशच्या तसं
''मी शिवसेना पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केला, पण शिवसेना भवनात बसुन विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.''
ADVERTISEMENT
''मला वाटते शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या व शिवसेना नेते आदित्य जी ठाकरे यांच्या शब्दाला किंमत नाही. पण आता मला कळले येथे विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांना पक्षांचे पुर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला या जुमानत नाही.''
ADVERTISEMENT
''मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत, रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसुन षडयंत्र रचत राहिल्या. मला सोशल मीडिया या पदावर काम करायचे नाही म्हणून मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पत्र देखील पाठवले. परंतु विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असे वाटत होते.''
हे ही वाचा : Jitendra Awhad : 'शरद पवारांना मी रडताना पाहिलंय'
''जर यांनी संघटना वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत आहे तर मी आपल्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे.''
''माझा पक्षाने टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद. पुढे कोणाचे असे राजकीय आयुष्य बर्बाद करू नका, नाही कर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चाहाड्या करणाऱ्या व षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आले आहे.''
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT