Shishir Shinde : ठाकरेंची आणखी एका नेत्याने सोडली साथ, कारणही सांगितलं?
गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये, असा आरोप शिशिर शिंदे यांनी राजीनाम्यात केला आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra political News Marathi : एकीकडे राज्यव्यापी शिबिरातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याच्या प्रयत्नात असलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना ठाकरेंची साथ सोडली. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर मुंबई होत असून, एक दिवस आधी शिशिर शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देण्याचं सविस्तर कारणही शिशिर शिंदे यांनी सांगितलं आहे. यात उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता पदाचा राजीनामा देताना शिंदे यांनी काही आरोप केले आहेत. शिंदेंनी म्हटलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये. अनेक वेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण पक्षप्रमुखांची भेटतच नव्हते.
व्हिडीओ >> उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्याचं कधी ठरलं? आमदार देशमुखांनी सांगितली आतली गोष्ट
त्याचबरोबर शिशिर शिंदेंनी असंही म्हटलं आहे की, त्यांना मनासारखं काम करायलाही मिळत नव्हतं. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यानंतर केवळ नावापुरत पद दिलं गेलं. त्यामुळे राजकीय जीवनातील चार वर्ष वाया गेली.