शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक
tentative schedule of Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीचे वेळापत्रक निश्चित झालं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून हे जाहीर करण्यात आले असून, 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या काळात ही सुनावणी होणार आहे.
ADVERTISEMENT

mumbaitak
Shiv Sena MLAs Disqualification News in Marathi : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याचं वेळापत्रक द्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर अखेर कार्यवाही सुरू झालीये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत प्रकरणावरील सुनावणी चालणार आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजून बरीच प्रतिक्षा करावी लागणार, असंच दिसतंय.
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रक
-13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत युक्तिवाद होणार आहे.
– 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांनी अंतिम सुनावणी होणार आहे.
– सर्व याचिकांच्या एकत्रीकरणावर (क्लबिंग) सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.