ठाकरे गटाची डोकेदुखी आणखी वाढणार, पक्षनिधीवरून राजकारण पेटलं

ADVERTISEMENT

shiv sena  party funds
shiv sena party funds
social share
google news

मुंबई/दीपेश त्रिपाठी: शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून (Election Commission) हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित करण्यात आले. तरीही ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून सुमारे 50 कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून पैसे काढल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. 

खातं कोण चालवतं?

शिवसेना पक्षाचे हे खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

हे ही वाचा >> जरांगेंनी घेतली बिनशर्त माघार, एका रात्रीत असं काय घडलं?

'आयकर'ला पत्र

हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यापासून शिंदे गटाकडे असलेल्या पक्षाचा कर कोण भरत आहे, याची माहिती घेण्यासाठीआर्थिक गुन्हे शाखेकडून आयकर विभागाला पत्र पाठवले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदेंची शिवसेना

निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये  एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित केले होते आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते. त्यामुळे पक्षनिधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा >>वेबलिंक, फोटो आणि लॉज, सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश

    follow whatsapp

    ADVERTISEMENT