Shiv Sena Portfolio list: भाजपने शिंदेंना गृह खातं दिलंच नाही, शिवसेनेला नेमकं काय-काय मिळालं?
Shiv Sena Portfolio Allocation: भाजपने गृह, महसूल ही खाती स्वत:कडे ठेवली आहेत. अशावेळी शिवसेनेला कोणती खाती दिली याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पाहा शिवसेनेला कोणती खाती मिळाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपने गृह खातं स्वत:कडेच ठेवलं
शिवसेनेला गृह आणि महसूल खातं दिलंच नाही
पाहा शिवसेनेला कोणती खाती मिळाली
Shiv Sena Portfolio: मुंबई: मुख्यमंत्री पद न मिळाल्यास किमान गृह खातं द्यावं यासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे बरेच दिवस अडून बसले होते. मात्र, काहीही झालं तरी गृह खातं हे मिळणार नाही. यावर भाजप ठाम होतं आणि शेवटपर्यंत ठाम राहीलं. कारण आज (21 डिसेंबर) जाहीर झालेल्या खाते वाटपात भाजपने विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडेच गृह खातं ठेवलं आहे. अशावेळी शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय मिळालं हे आपण आता पाहूया. (shiv sena portfolio list bjp did not give eknath shinde the home portfolio what exactly did shiv sena get)
भाजपने गृह आणि महसूल ही अत्यंत महत्त्वाची खाती ही स्वत:कडे ठेवली आहेत. तर त्याऐवजी त्यांनी शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि आरोग्य ही महत्त्वाची खाती दिली आहेत.
हे ही वाचा>> Portfolio Allocation: अखेर... खाते वाटप जाहीर! शिंदे-अजितदादांना भाजपने काय दिलं?, पाहा संपूर्ण यादी
आता या महत्त्वाच्या खात्यांपैकी नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. त्यामुळे आता त्यांनी आपल्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती दिली आहेत यावर टाकूया एक नजर.
शिवसेनेला कोणती खाती?
एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)










