‘…मुसेवाला टाइप करुन टाकेन’, संजय राऊतांना लॉरेन्स टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

Sanjay Raut Death Threat: शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत अज्ञात नंबरवरून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

mp sanjay raut death threat from lawrence gang
mp sanjay raut death threat from lawrence gang
social share
google news

Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanajy Raut) यांना लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमकीनंतर राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेज करून ‘मी तुझाही मुसेवाला करून टाकेन’, असं म्हटलं आहे. मेसेजमध्ये राऊत यांना हिंदूविरोधी म्हणत शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल रात्री एका संशयिताला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (shiv sena ubt party mp sanjay raut death threat from lawrence gang)

लॉरेन्सच्या नावाने धमकी

लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने मिळालेल्या या धमकीमध्ये म्हटले आहे की, ‘जर तुम्ही दिल्लीत सापडलात, तर तुम्हाला एके 47 ने उडवले जाईल, मूसेवाला करून टाकू.’ या धमकीनंतर राऊत यांनी पत्र लिहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा- ‘लोकांनी धर्माच्या भांगेच्या नशेत मतदान करावे हे कारस्थान’, भाजपवर जहरी टीका

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा ही धमकी कन्नड रक्षण वेदिका नावाच्या संस्थेकडून आल्याचा दावा त्यांनी केला होता.

सलमान खानलाही धमकी

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला लॉरेन्स टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. याआधीही सलमानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्या होत्या आणि त्याने त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. गेल्या आठवड्यात लखनऊच्या प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकान खुन खुन जी ज्वेलर्सचा मालक उत्कर्ष अग्रवाल यांच्याकडे गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल आला होता त्यावेळी कॉलरने 30 लाख रुपयांची मागणी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp