‘नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?’, ठाकरेंच्या सेनेचा पलटवार, बावनपत्ती’ म्हणत…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

uddhav Thackeray shiv sena slams Maharashtra bjp leader.
uddhav Thackeray shiv sena slams Maharashtra bjp leader.
social share
google news

Chandrashekhar Bawankule, Shiv Sena (UBT) : चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊ येथील एका हॉटेलमधील फोटो खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केला. याच फोटोवरून भाजप विरुद्ध संजय राऊत यांच्यात जुंपलीये. भाजपकडून ठाकरे गटावर टीकेचे बाण डागण्यात आले. त्याला आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेंना बावनपत्ती म्हणत ठाकरेंच्या सेनेनं पलवटवार केला.

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कॅसिनोतील फोटोने राज्याच्या राजकारणात कलगीतुरा रंगला. बावनकुळेंनी त्यावर खुलासा केला. तर भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर हल्ला चढवला. भाजपकडून झालेल्या टीकेला आता सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर दिलं.

ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला काय दिलं उत्तर?

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे महाशय उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात व असे बोलणे ही एक विकृती आहे, असे राज्यातील देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत नाही. त्याच बावनकुळ्यांचा एक ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> भारतात येताच बावनकुळेंची कॅसिनोतील ‘त्या’ फोटोवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सामना संपादकीयात म्हटलंय की, “महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे हे अध्यक्ष सध्या चीनचा प्रदेश ‘मकाऊ’ येथे सहकुटुंब असल्याचे प्रदेश भाजपने जाहीर केले. ‘कुळे’ हे त्यांच्या कुटुंबासोबत कोठे असावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील ‘कॅसिनो’मध्ये मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे. कुळे यांच्या टेबलवर ‘पोकर्स’ नामक जुगारात खेळले जाणारे चलन विखुरले आहे व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती ‘आकडा’ लावला आहे तो त्यांच्या टेबलावरील स्क्रीनवर झळकला आहे.”

ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला काय केले सवाल?

बावनकुळेंच्या या छायाचित्रावरून ठाकरेंच्या सेनेने काही सवाल उपस्थित केले आहेत. ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “हे छायाचित्र प्रसिद्ध होताच भाजपास इतके हडबडून जायचे कारण नव्हते. ‘छे, छे! आमचे प्रदेशाध्यक्ष बसले आहेत तो जुगाराचा अड्डा नव्हेच. ते तर त्यांच्या कुटुंबासह मकाऊ नगरीत पर्यटनास व श्रमपरिहारास गेले आहेत.’ त्यानंतर कुळे यांनी स्वतः केलेला खुलासा तर बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीचा आहे. ‘छे, छे! माझा आणि त्या जुगाराच्या हॉलचा संबंध नाही. मी तर ते एक रेस्टॉरंट समजून खाण्यापिण्यासाठी गेलो.’ त्या छायाचित्राचा इतका धसका घेण्याचे व त्यानंतर आव्हान-प्रतिआव्हान देण्यासाठी नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?”, असा टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘त्या’ व्हीपवरून तुफान वाद, प्रभू-जेठमलानी भिडले, वाचा सुनावणी जशीच्या तशी..

“कॅसिनोवाल्यांच्या पैशांवर भाजप निवडणूक लढवतो व आमदारांची खरेदी-विक्री करून सत्ता कमावतो. इतका सरळसोट व्यवहार असताना महाराष्ट्राच्या बावनकुळ्यांना कॅसिनोत गेले म्हणून अपराधी वाटण्याचे कारण काय? महाराष्ट्रात सध्या नशेचा जोरदार व्यापार सुरूच आहे. त्याच्या जोडीला ‘कॅसिनो’चा जुगार सुरू करता येईल काय? याचा अभ्यास करायला ते तेथे गेले असतील तर मग त्यांच्या माघारी राज्यातील भाजप प्रवक्त्यांना खुलाशांमागून खुलासे करण्याची गरज का पडावी? अर्थात कुळ्यांच्या जागी भाजपविरोधी एखादा नेता असता तर अशा फोटोवरून फडणवीसांपासून बावनकुळ्यांपर्यंत सगळ्यांनी एकजात नैतिकता, संस्कृती बुडाल्याचा छातीठोक तोफखानाच सोडला असता व संबंधित चित्रातील महनीय व्यक्तीवर ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून चौकशी पूर्ण होण्याआधीच बदनामीच्या फासावर लटकवून हे लोक मोकळे झाले असते”, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांवरही बाण डागला आहे.

ADVERTISEMENT

जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही?

“भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत. पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले. कुळे येतील, कुळे जातील. त्यांच्या समर्थनार्थ झांजा वाजवणाऱ्यांनो, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती! महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? भाजपच्या अमृतकाळात काहीही घडू शकते”, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपकडून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT