Sindhudurga: शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी शिंदे सरकारचा नवा जीआर जसाच्या तसा..

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी नवा जीआर जारी
शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी नवा जीआर जारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्यात येणार

point

नव्याने पुतळा उभारणीसाठी एक समिती गठीत

point

नव्या समितीबाबत शिंदे सरकारकडून जीआर जारी

मुंबई: किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता त्याच ठिकाणी नव्याने पुतळा उभारण्यात येणार आहे. ज्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. ज्यामध्ये एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता नवी समिती गठीत करण्यात आली असून शिंदे सरकारने त्याचा जीआर देखील तात्काळ जारी केला आहे. (sindhudurga shinde government new gr for chhatrapati shivaji maharaj new statue on rajkot fort)

शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्याच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर इतिहासकार जयसिंगराव पवार हे समितीत विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत.

याशिवाय या समितीत IIT मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक अभियंत्यांचा देखीस समावेश करण्यात आला आहे. पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाची संकल्पना आणि कार्यपद्धती याच्या निश्चितीसाठी राज्य शासनाकडून ही समिती गठीत करण्यात आली आहे. ज्याचा अधिकृत जीआर हा आता  राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'तो' जीआर जसाच्या तसा.. 

किल्ले राजकोट तालुका मालवण, जि. सिंधूदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याबाबत वाव, संकल्पना, कार्यपध्दती निश्चित करणे समिती गठीत करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग,
शासन निर्णय क्रमांक : बीडीजी-२०२४/प्र.क्र.३३१ / इमा-३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ३० ऑगस्ट, २०२४

ADVERTISEMENT

प्रस्तावना -

ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथे भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून दिनांक ०४.१२.२०२३ रोजी भारतीय नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. दिनांक २६.०८.२०२४ रोजी पुतळ्यास दुर्घटना झाली.

सदर दुर्घटनेसंबंधात मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.२८.०८.२०२४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनश्च नव्याने उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्याच्या कामाचा वाव, संकल्पना, कार्यपध्दती निश्चितीसाठी शिफारशी करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत बैठकीत ठरले. त्यानुसार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :

किल्ले राजकोट तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याबाबत वाव, संकल्पना, कार्यपध्दती निश्चितीसाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

1. श्रीमती. मनीषा पाटणकर- म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सा.बां. विभाग : अध्यक्ष

2. श्री. सदाशिव साळुंखे, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय : सदस्य सचिव

3. कमोडोर एम. दोराईबाबू, भारतीय नौदलाचे प्रतिनिधी : सदस्य

4.  प्रा. जांगीड, ३० वर्षाचा स्ट्रक्चरल इंजीनिअरींगचा अनुभव, आय. आय. टी. मुंबई : सदस्य

5. प्रा. परीदा, १२ वर्षाचा मेटलर्जी इंजीनिअरींग व मटेरियल सायन्सचा अनुभव, आय.आय.टी., मुंबई : सदस्य

6. श्री. राजीव मिश्रा, संचालक, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मुंबई : सदस्य

7. श्री. राजे रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे (Navy) अभ्यासक : सदस्य

8. श्री. जयसिंगराव पवार, इतिहासकार : विशेष निमंत्रित

9.  इतर विशेष निमंत्रित

2. वरीलप्रमाणे गठीत करण्यांत आलेली समिती खालील बाबींवर विचार करुन तद्नुषंगाने यथोचित शिफारशी शासनास सादर करेल.

अ) किल्ले राजकोट, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाचा वाव, संकल्पना व कार्यपध्दती निश्चितीसाठी शिफारशी करणे

3. वरीलप्रमाणे आवश्यक बाबींची शिफारस करण्यासाठी नेमून दिलेले काम सत्वर हाती घेऊन, समितीने तात्काळ अहवाल सादर करावा.

4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८३०१३५७५१६४१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रति,
अपर मुख्य सचिव (सा.बां.), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई 
सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
कमोडोर एम. दोराईबाबू, भारतीय नौदलाचे प्रतिनिधी
विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी शाखा, आय. आय. टी., मुंबई
विभाग : प्रमुख, मेटलर्जी इंजीनिअरींग व मटेरियल सायन्स, आय. आय. टी. मुंबई
प्रा. जांगीड, स्थापत्य अभियांत्रिकी शाखा, आय. आय. टी., मुंबई
प्रा. परीदा, मेटलर्जी इंजीनिअरींग व मटेरियल सायन्स, आय. आय. टी., मुंबई श्री.राजीव मिश्रा, संचालक, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मुंबई
श्री. राजे रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमार (Navy) अभ्यासक 
श्री. जयसिंगराव पवार, इतिहासकार

जीआर इथून करा डाऊनलोड>> View PDF
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT