Walmik Karad: '...यासाठी वाल्मिकने संतोष देशमुखांची केली हत्या', SIT ने थेट कोर्टातच...
अवादा कंपनीकडून खंडणी मिळत नसल्याने आणि त्यात संतोष देशमुख हे अडथळा ठरत असल्याने म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली असा दावा एसआयटीने कोर्टात केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या

एसआयटीने कोर्टात दिलेल्या माहितीत मोठा खुलासा

वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही, यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या झाली
Walmik Karad Murder Santosh Deshmukh: बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टाने वाल्मिक कराड याला आज (15 जानेवारी) 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता SIT हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची कसून चौकशी करू शकतं. दरम्यान, वाल्मिकची कोठडी मिळावी यासाठी कोर्टात SIT ने जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे. (sit claims in court that walmik karad and other accused killed santosh deshmukh because he was an obstacle to extortion)
खंडणीमध्ये अडथळा ठरत असल्याने वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली असल्याचा दावा एसआयटीने यावेळी कोर्टात केला.
पाहा SIT ने कोर्टात काय सांगितलं...
खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. असा मोठा खुलासा एसआयटीने कोर्टात दिलेल्या माहितीत केला. याच आधारे त्यांनी वाल्मिक कराडची कोठडी मागितली.
हे ही वाचा>>'वाल्मिक कराडने खुनाच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी..' कोर्टात प्रचंड खळबळजनक दावा
वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. पण कंपनीने ही खंडणी दिली नाही. या सगळ्यात संतोष देशमुख हे अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.