Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर संक्रात, 'आका'वर लावला 'मकोका', कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Walmik Karad Mcoca: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी SIT ने मोठा कारवाई करत आरोपी वाल्मिक कराड याच्याविरोधात MCOCA लावला आहे. त्यामुळे कराड अधिक अडचणीत सापडला आहे.

ADVERTISEMENT

 'आका'वर लावला 'मकोका'
'आका'वर लावला 'मकोका'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडवर SIT ने लावला मोक्का

point

SIT आता कोर्टाकडे वाल्मिक कराडची कोठडी मागणार

point

खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ओमकार वाबळे, बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आता SIT ने सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. या हत्या प्रकरणात SIT ने आरोपी वाल्मिक कराड याला मकोका (MCOCA) लावला आहे. यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी SIT ने अर्ज केला आहे. 

हत्येच्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी SIT ने कोर्टाकडे अर्ज केला आहे. ज्या प्रकरणी आज (14 जानेवारी) 3 वाजता MCOCA कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आता MCOCA कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट घेतलं जाणार आहे.

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने पोलीस कोठडी नाकारत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

हे ही वाचा>> Walmik Karad Mother Protest : "माझ्या लेकावर अन्याय, त्याला मुक्त करा", वाल्मिकच्या आईचं ठिय्या आंदोलन

हत्या प्रकरणात ताबा घ्या असा अर्ज सीआयडीकडून कोर्टात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एसआयटीचे अधिकारी हे मकोका कोर्टात दाखल झाले असून त्यांनी देखील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp