Sharmistha Mukherjee :”सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाही”, गांधी कुटुंबाबद्दल गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

Pranab Mukherjee told daughter Sharmistha new book : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने खळबळ माजली आहे. त्यांनी नेमके काय खुलासे केले आहेत, जाणून घ्या…

ADVERTISEMENT

Sonia Gandhi won’t make me PM; what Told Pranab Mukherjee to daughter Sharmistha?
Sonia Gandhi won’t make me PM; what Told Pranab Mukherjee to daughter Sharmistha?
social share
google news

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावरील एका पुस्तकाने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि माजी काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी “In Pranab, My Father: A Daughter Remembers” हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधींबद्दलचे किस्से लिहिले असून, प्रणब मुखर्जी पंतप्रधान का झाले नाही, याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

“सोनिया गांधी मला पंतप्रधान बनवणार नाही”

शर्मिष्ठा मुखर्जी पुस्तकात 2004 मध्ये प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान पदाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. सोनिया गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले, पण त्यांनी माघार घेतली. पण, पंतप्रधान पदासाठी प्रणव मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग यांची नावे स्पर्धेत होती. त्यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितलं आहे.

हेही वाचा >> ‘अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?

शर्मिष्ठा मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे की, “सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावांची प्रबळ दावेदार म्हणून माध्यमांत चर्चा सुरू झाली होती.” शर्मिष्ठा यांनी पुढे लिहिलंय की, बाबा कामात खूप व्यस्त होते, त्यामुळे मला त्यांना भेटताच आले नाही. पण, मी त्यांना फोनवरून बोलले. तुम्ही पंतप्रधान होणार आहात, असं मी त्यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, नाही. ती मला पंतप्रधान करणार नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान होतील. पण, त्यांनी पटकन याची घोषणा केली पाहिजे. ही अनिश्चितता देशासाठी चांगली नाही.”

शर्मिष्ठा यांनी असंही म्हटले आहे की, “बाबांनी (प्रणव मुखर्जी) पत्रकारांनाही सांगितलं होतं की, सोनिया गांधी मला पंतप्रधान करतील अशी आशा नाही. जर अपेक्षाच नाही, तर नाराजीही नाही, असं ते म्हणालेले. प्रणव मुखर्जींना पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा होती. पण, आपण होणार नाही, हेही त्यांना माहिती होतं”, असं शर्मिष्ठांनी म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp