NCP: शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून, नेमका किस्सा काय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

speaking on question why ajit pawar was not present at diwali program in baramati sharad pawar backed up ajitdada
speaking on question why ajit pawar was not present at diwali program in baramati sharad pawar backed up ajitdada
social share
google news

Sharad Pawar Diwali Event Baramati Ajit Pawar: बारामती: अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. (speaking on question why ajit pawar was not present at diwali program in baramati sharad pawar backed up ajitdada)

ADVERTISEMENT

शरद पवार हुकूमशाह आहेत, ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत.. असे गंभीर आरोप अजित पवारांच्या वकिलांनी निवडणूक आयोगापुढे केले होते. तसंच पक्षात बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांवर अत्यंत बोचरी टीका देखील केली होती. मात्र, असं असतानाही आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपले पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावरून घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे. याचंच एक उदाहरण आज (14 नोव्हेंबर) बारामती पाहायला मिळालं.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर बरीच टीका केली होती. मात्र, दुसरीकडे शरद पवार यांनी आतापर्यंत एकदाही अजित पवारांवर वैयक्तिक टीका केल्याचं पाहायला मिळालं नाही. किंबहुना अनेकदा अजित पवारांना सावरून घेतल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Rohit Pawar : “फडणवीस नेत्यांना पुढे करून वाद…”, पवारांच्या विधानाने खळबळ

एकीकडे पक्ष आणि चिन्ह मिळविण्यासाठी अजित पवार गट निवडणूक आयोगात शरद पवारांवर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे मागील काही दिवसात सातत्याने शरद पवारांची बंद दाराआड भेट घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते अनेक दिवस राजकीयदृष्ट्या सक्रीय नव्हते. तसंच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून असंही जाहीर केलं होतं की, डेंग्यूमुळे प्रकृती ठीक नसल्याने ते यंदा बारामतीतील दिवाळी कार्यक्रमात हजर राहू शकणार नाही. मात्र, या ट्विटच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी साधारण तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समोर आलं होतं. पण ही भेट कौटुंबिक असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

पण त्याचवेळी म्हणजे अजित पवार यांची प्रकृती ठीक नसतानाही ते अचानक दिल्लीला गेले. इथे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण आपण आजारी असल्याने कोणत्याही जाहीर कार्यक्रमात जाणार नाही, लोकांची भेट घेणार नाही असं म्हणणारे अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sharad Pawar: ‘जात यावर मी कधीही राजकारण केलं नाही, पण…’, ‘त्या’ दाखल्यावर पवारांचं मोठं विधान

अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर ते दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामतीतील कार्यक्रमात सहभागी होतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या कार्यक्रमात हजर न राहणचं अजित पवारांनी पसंत केलं.

शरद पवारांनी अजितदादांना कसं सावरलं?

पण याच मुद्द्यावरून शरद पवार यांना पत्रकार परिषदेत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना सावरुन घेतलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘काही व्यक्तिगत कामांमुळे कोणी उपस्थित राहिले नाही, कोणी आजारपणामुळे उपस्थित राहिले नाहीत.. पण गैरसमज नसावा.. तुम्ही सगळे स्थानिक पत्रकार आहात, गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी झाली का वाढली? हे तुम्हीच तपासा.’ असं म्हणत शरद पवारांनी पवार कुटुंबातील वाद जाहीरपणे येणार नाही यांची पुन्हा एकदा काळजी घेतली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT