Mumbai Tak Chavadi: मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार, उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा

ADVERTISEMENT

State Industries Minister Uday Samant, while speaking on Mumbai Tak Chavadi, has claimed that Shiv Sena will be the Mayor of Mumbai.
State Industries Minister Uday Samant, while speaking on Mumbai Tak Chavadi, has claimed that Shiv Sena will be the Mayor of Mumbai.
social share
google news

मुंबई: मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर (Shiv Sena Mayor)असा दावा राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) बोलताना केलं आहे. चावडीवर बोलताना सामंत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पण यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वासही व्यक्त केला. (state industries minister uday samant mumbai tak chavadi claimed shiv sena mayor mumbai bmc)

पाहा उदय सामंत नेमकं काय म्हणाले:

‘स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की, मुंबईचा जो महापौर असेल तो शिवसेना-भाजप आणि महायुतीचाच असेल. यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की, काही ठिकाणी… पहिले किती नगरसेवक निवडून येतील हे सगळं बघितलं पाहिजे. मघाशी मी म्हटलं तसं पंतप्रधान पदाचा उमेदवार का जाहीर होत नाही. हे तर मुंबई महापालिका आहे.’

‘हे जे पाटण्याला सर्व विद्वान लोकं गेले होते. ही फॅमेली पार्टी होती.. मग त्यांनी पंतप्रधान उमेदवार का जाहीर केला नाही? महापालिका ही छोटी आहे. पण देशाचं राजकारण करत असातना त्यांची पण काही अडचण असते ना. जशी त्यांची अडचण आहे तशी आमचीही अडचण आहे ना..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…

‘आम्हाला आत्मविश्वास आहे ना.. म्हणून तर म्हटलं ना महायुतीचाच महापौर होणार. शिवसेनेचा पण होईल.. शिवसेनेचा पण होऊ शकतो. मला माझा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी भाजपचा महापौर होणार हे त्यांना म्हणावं लागतं. शिवसेनेच्या लोकांना धीर देण्यासाठी महापौर होणार हे मला म्हणावं लागतं. काही पक्ष नाहीच आहेत. ते पण परवा म्हणाले आमचा महापौर होणार आहे.’

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसली ‘ही’ व्यक्ती, भाजपला मिळालं आयतं कोलीत!

‘त्यामुळे शेवटी ही पक्षीय ताकद देण्याची प्रक्रिया आहे. खरं तर निवडणुकीनंतर जागा निवडून येतील त्यावरच गोष्टी ठरतील. पण तीनही पक्षाचा महापौर असेल.’ असं उदय सामंत यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

भाजपचाही मुंबईच्या महापौर पदावर दावा

दरम्यान, याआधी भाजपने मागील काही महिन्यांपासूनच असा दावा सुरू केला आहे की, यंदा मुंबईत भाजपचाच महापौर होईल. असं असताना आता या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय चढाओढी पाहायला मिळतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT