Supriya Sule : ‘118 जागा लढल्यावर…’, दिलीप वळसे पाटलांवर सुळेंचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Supriya Sule slams to dilip walse patil Over he's Statement that sharad pawar hadn't get full majority.
Supriya Sule slams to dilip walse patil Over he's Statement that sharad pawar hadn't get full majority.
social share
google news

Supriya sule on Dilip Walse Patil Statement : शरद पवार इतके मोठे नेते असूनही आपल्याला बहुमत मिळालं नाही, असं विधान दिलीप वळसे पाटलांनी केलं होतं. त्यावरून शरद पवार समर्थकांनी त्यांच्यावर टीका केली. वळसे पाटलांनी खुलासा केला. आता सुप्रिया सुळे यांनी इतिहास सांगत उलट सवाल केला आहे. (Supriya Sule recites to dilip Walse Patil)

ADVERTISEMENT

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानाला उत्तर दिले. “दिलीप वळसे पाटलांनी त्यावर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण, परत प्रश्न विचारला त्यामुळे काही फॅक्ट्स मांडते. शरद पवार हे महाराष्ट्राचे एक वेळा नाही, तर चार वेळा मुख्यमंत्री झालेत. त्यानंतर 1990 साली स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले.”

‘राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी विधानसभाच लढवली नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ते एकदाही विधानसभा लढलेले नाहीत. ज्यांची ज्यांची उदाहरणं हे सातत्याने देतात, ते सगळे इंडिया आघाडीमध्ये आहेत. ते सगळे शरद पवार यांना नेता मानतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून शरद पवार हे एकदाही विधानसभा लढलेले नाहीत. ते दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होते”, असं उत्तर सुप्रिया सुळेंनी वळसे पाटलांच्या विधानाला दिले.

हे वाचलं का?

वाचा >> Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून 118 जागा नेहमी लढलेल्या आहेत. त्याच्यामुळे 150 किंवा 144 चा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं शक्यच नाही. कारण तितक्या जागाच लढल्या नाहीत. एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला होता. त्यांना तो राजकीय दृष्ट्या योग्य वाटला. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते”, असा इतिहास सुप्रिया सुळेंनी सांगितला.

दिलीप वळसे पाटील काय म्हणालेले?

मंचर येथे झालेल्या सभेत दिलीप वळसे पाटील म्हणाले, “शरद पवार यांच्या उंचीचा दुसरा नेता देशामध्ये नाही, पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही त्यांना बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही.”

ADVERTISEMENT

वाचा >> CM शिंदेंना ठाण्यावरून घेरलं, आता मंत्र्यालाही झापलं! महायुतीत अजित पवारच ‘दादा’?

इतकंच नाही, तर वळसे पाटलांनी इतर राज्यातील प्रादेशिक पक्षाचा दाखलाही यावेळी दिला होता. “तिकडे ममता बॅनर्जी होताहेत. मायावती होताहेत. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष पुढे जाताहेत आणि आपले उत्तुंग नेते असताना आपण काही ठराविक नंबर्सच्या पुढे जाऊ शकत नाही. आमचे जास्तीत जास्त 60-70 आमदार निवडून येतात. मग कुणाशी तरी आघाडी करायला लागते. या पक्षाशी आघाडी, नाहीतर त्या पक्षाशी आघाडी.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT