NCP: सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करा ‘या’ व्यक्तीने सांगितलं, शरद पवारांचा प्रचंड मोठा दावा
Sharad Pawar: सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करा असा प्रस्ताव अजित पवार यांनीच दिला असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकारी अध्यक्ष पदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड झाल्याने पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या सगळ्यात अजित पवार (Ajit Pawar) यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष झाल्याने अजित पवार नाराज आहेत अशी जोरदार चर्चा रंगली आहे. असं असताना आता सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्याबाबत कोणी सांगितलं होतं याबाबत मोठा दावा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. (supriya sule ncp working president sharad pawar claim ajit pawar suggestion maharashtra political news)
कार्याध्यक्ष पदाची घोषणा केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोणी कार्याध्यक्ष करायला सांगितलं तेच. जाहीर करुन टाकलं.
हे ही वाचा >> Mira Road Murder: ‘HIV पॉझिटिव्ह, शारीरिक संबंध…’ मनोज साने प्रचंड चाणाक्ष आरोपी!
सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्यामुळे अजित पवार नाराज आहेत. असा सवाल जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘ तसंही सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करा याबाबतचा प्रस्तावच अजित पवारांनी दिला होता. तर आता त्यांच्या खुश असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच कुठे येतो?’ असा मोठा दावा यावेळी शरद पवारांनी केला.म्हणजेच शरद पवार यांना अजित पवारांनीच सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव दिला होता.