Supriya Sule : “ते वकील शरद पवारांना सॉरी बोलतात”, सुळेंनी सांगितला दिल्लीतला किस्सा
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात जेव्हा अजित पवार गटाचे वकील भेटतात, तेव्हा ते शरद पवारांना सॉरी बोलतात, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी मतदारांशी बोलताना दिली.
ADVERTISEMENT

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झालेत. अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केल्याने आता लढाई कोर्टात आणि निवडणूक आयोगात गेलीये. त्याच्या सुनावण्या सुरू असून, याबद्दलचे अनुभव सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातील मतदारांना सांगितले. इंदापूर तालुक्यातील बोरी गावात ग्रामस्थांनी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील कोर्टातील अनुभव सांगितले. त्याचबरोबर मी गायब झालेले नाही, कामामुळे व्यस्त झाले आहे, अशी विनंतीही केली.
सुप्रिया सुळे बोरीतील ग्रामस्थांशी बोलताना म्हणाल्या, “20-21 तारखेला निवडणूक आयोगाची लढाई, मग सुप्रीम कोर्टातील लढाई. मतदारसंघातील अर्धा वेळ केसमध्ये चाललाय. नवरा-मुलांना टाटा-बाय तुम्ही आईला टीव्हीवरच बघा. काय करणार? सगळ्या जबाबदाऱ्या असतात. सगळं तर माणूस करू शकत नाही. त्यामुळे नवरा, मुलं, कुटुंबाला ऑक्टोबरपर्यंत टाटा. वेळच नाहीये”, असं सांगत राष्ट्रवादीतील फूटीनंतर काम वाढल्याची कबुली सुप्रिया सुळेंनी दिली.
हे ही वाचा >> शिंदेंच्या दोन नेत्यांमध्ये राजकीय कुस्ती, अनिल परबांकडून थेट विजयी उमेदवाराचं घोषित
“मतदारसंघ बघायचा की पक्षाची कामं बघायची की कोर्टाच्या केस बघायच्या? पवारसाहेब स्वतः जातात, पण जनाची नाही, तर मनाची आहे ना… ८० वर्षांच्या वडिलांना एकटं जाऊ देईन काय कोर्टात. केस पांढरे फक्त वयाने नाही होत. जबाबदाऱ्या, विचार या सगळ्या गोष्टी आहेतच ना”, असं खासदार सुळे म्हणाल्या.
हारेंगे, जितेंगे बाद में देखेंगे…
“आता सुप्रीम कोर्टात मजा यायला लागलीये. पहिल्यांदा असं वाटतं एवढं मोठं सुप्रीम कोर्ट कसं जाणार. हारेंगे जितेंगे बाद में देखेंगे, लढेंगे जरूर. नवीन शिकायला मिळतं. आपल्याकडे म्हणतात ना कोर्टाची पायरी चढू नका. आता एकदा चढल्यावर उतरायचं नाही. कोर्टात जे होईल ते बघू, पण खरंच नवीन शिकायला मिळतं”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी दिल्लीती अनुभव सांगितले.