Ganpat Gaikwad: ‘हा गोळीबार नाही.. शिंदे-फडणवीसांमधील गँगवार’, सुषमा अंधारेंच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

sushma andhare reaction on ulhasnagar firing incident ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad ulhasnagar firing
sushma andhare reaction on ulhasnagar firing incident ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad ulhasnagar firing
social share
google news

Sushma Andhare Reaction on Ulhasanagar Firing Case : जका खान, वाशिम: उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर बेछुट गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती.या गोळीबाराचे आता सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या प्रकरणात आता गणपत गायकवाडांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यात आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली आहे. (sushma andhare reaction on ulhasnagar firing incident ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad ulhasnagar firing)

सुषमा अंधारे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी या गोळीबारामागचं खळबळजनक कारण सांगितले आहे. हा गोळीबार म्हणजे कोणती अंतर्गत धुसफुस नव्हती, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद आहे. या दोन्ही नेत्यांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोहोचलाय, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : ‘हा निव्वळ मूर्खपणा…’ Poonam Pandey निधनाची Instagram पोस्ट म्हणजे फक्त…

उल्हासनगरमधील गोळीबार ही कोणती अंतर्गत धुसफुस नव्हती. तर हा शिंदे-फडणवीस यांच्यातला गँगवार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोहोचलाय. मै बडा की तु बडा…हे दाखवण्याची रस्सीखेच आहे,असल्याचा खळबळजनक खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच गँगवारमध्ये एकेकाने आपआपले गुंड पाळायचे असतात. तसेच हे लोकप्रतिनिधी नाहीत हे गुंड पाळले आहेत, असा टोला देखील अंधारे यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या दादागिरीने आणि अरेरावीचे नावासह किस्सेच सांगितले. जळगावमध्ये किशोर पाटील एका पत्रकाराला बेदम मारहाण करतो. संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला मारहाण करतो. आमदार गीता जैन अभियंताला मारहाण करतात. बुलढाण्याचा संजय गायकवाड अत्ंयत गलिच्छ आणि अर्वांच्च भाषेत बोलतो, उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाच्या सदस्याला भाजप आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतो.सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो. प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो. शुक्रवारी गणपत गायकवाड गोळीबार करून त्या घटनेचे समर्थन करताना दिसले.

हे ही वाचा : Ganpat Gaikwad : गोळीबार प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, ‘कायदा सगळ्यांना…’

दरम्यान या सर्व घटनेत जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप बसला असता, तर इतकं सगळ घडलं नसतं, असे देखील सुषमा अंधारे सांगतात. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या गँगवारमध्ये महाराष्ट्राच मर्यादाशील राजकारण, इथली शालिनता, कायदा सुव्यवस्थेला हरताळ फासण्याचे काम विद्यमान खोके सरकारने केलेले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी आणि नापास ठरल्याचीही टीका अंधारे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT