Revanth Reddy : तेलंगणात केसी रावांना धोबीपछाड, काँग्रेसचा रोवला झेंडा; कोण आहेत रेड्डी?
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार एन कॅप्टन उत्तमकुमार रेड्डी, कोमाटिरेड्डी वेकंट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क सारखी नावे चर्चेत आहेत. पण या सगळ्या इच्छुक नावांमध्ये रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे.
ADVERTISEMENT
Who is Revanth Reddy Telangana Congress CM Race : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते आहे, तर तेलंगणात (Telangana Election Result 2023) काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता तेलंगणात केसीआर (k Chandrashekhar Rao) यांची सत्ता स्थापण करण्याची हॅट्ट्रीक हुकणार आहे आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या तयारीला लागली आहे. असे असताना आता तेलंगणमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत रेवंत रेड्डी (revanth reddy) यांचे नाव आघाडीवर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेले रेवंत रेड्डी कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (telangana assembly election result 2023 who is revanth reddy telangana congress cm race k Chandrashekhar rao rahul gandhi )
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नावांची चर्चा
तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा आकडा काढल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु झाली आहे. या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार एन कॅप्टन उत्तमकुमार रेड्डी, कोमाटिरेड्डी वेकंट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क सारखी नावे चर्चेत आहेत. यासोबत मोहम्मद अझरूद्दीन देखील विधानसभा निवडणूक लढतायत. पण या सगळ्या इच्छुक नावांमध्ये रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे.
हे ही वाचा : MP Election 2023 : शिवराज सिंह चौहान नाही, तर कोण होणार मुख्यमंत्री? 5 नावे स्पर्धेत
खरं तर तेलंगणामधील काँग्रेसच्या विजयाचे सर्वाधिक श्रेय रेवंत रेड्डी यांना जाते. याच कारणामुळे मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून सर्वाधिक चर्चा रेवंत रेड्डी यांच्या नावाची आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आहेत. रेड्डी हे 2019 मध्ये जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी एक आहेत. या निवडणुकीतही रेवंत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात गजवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हे वाचलं का?
रेवंत रेड्डी यांच्या नावाची चर्चा
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी, जेव्हा रेवंत रेड्डी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ ‘सीएम-सीएम’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रेवंत रेड्डी काँग्रेसचा चेहरा राहिले. तसेच प्रचारा दरम्यान रेवंत रेड्डी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत दिसून आले होते.
हे ही वाचा : Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!
तेलंगणाची स्थापना 2013 मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. तर काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करते. अशात काँग्रेसचा तेलंगणातला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बनणार का? अशी चर्चा सूरू झाली आहे.दरम्यान रेड्डी यांनी निवडणुकीपूर्वी 119 जागा असलेल्या तेलंगणात काँग्रेसचे 80 पेक्षा जास्त आमदार असतील, असा दावा केला होता.
ADVERTISEMENT
कोण आहेत रेवंत रेड्डी?
रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969 मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला.रेड्डी यांनी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून (ABVP)केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले होते.
ADVERTISEMENT
2017 मध्ये रेवंत रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 2018 मध्ये ते विधानसभा निवडणूक हरले होते. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी मलकाजगिरीवरी तिकीट दिले होते. या निवडणूकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पद देण्यात आले होते. सध्या ते तेलंगणात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख चेहरा आहेत. आता रेवंत रेड्डी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT