Priyanka Chaturvedi: ‘एकाही नेत्यावर ईडीचे गुन्हे नाहीत’, शेवाळेंच्या दाव्यावर ठाकरेंच्या खासदाराने काढली यादी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India Today Conclave Mumbai Priyanka Chaturvedi vs Rahul Shevale : इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेवच्या दुसऱ्या दिवशी (UBT)ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिंदेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक युद्ध रंगलं. या चर्चेदरम्यान आमच्या एकाही नेत्यावर ईडीचे गुन्हे नाही आहेत, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला होता. प्रियंका चतुर्वेदींनी हा दावा खोडून काढत थेट शिंदे गटाच्या नेत्याची यादीच बाहेर काढली आहे. (ubt priyanka chaturvedi criticize shinde government rahul shevale india today conclave mumbai 2023 nda vs india)

ADVERTISEMENT

इंडिया आघाडी विरूद्ध एनडीए या विषयावर चर्चा करण्यासाठी ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिंदेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव भाटी आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत उपस्थित होत्या.

हे ही वाचा : Maharashtra Politics: अजित पवार की एकनाथ शिंदे… भाजपला कोण ठरतंय डोकेदुखी?

शिंदे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल असल्याने ते भाजपप्रणित एनडीएत सामील झाले, त्यानंतर त्यांच्यावरील गुन्ह्याची चौकशी थांबली. तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये जाऊन गंगेसारखे पवित्र झालात? असा सवाल राहुल शेवाळे यांना विचारण्यात आला होता. यावेळी राहुल शेवाळे यांनी नेत्यांवरील गुन्ह्यांमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप फेटाळला. ही गोष्ट चुकीची आहे, आम्ही एनडीएसोबत गेल्या 25 वर्षापासून आहोत, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले. त्याचसोबत आमच्या कोणत्याच नेत्यांवर केस नाही.कुणावरही ईडीची ही केस नसल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला होता.

हे वाचलं का?

2019 च्या निवडणूकीत जनतेने स्पष्ट निकाल दिला होता. त्यामुळे जनतेचा कौल आणि बाळासाहेबांचा विचार या गोष्टींना घेऊन आम्ही भाजप सोबत गेलो. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतल्याचे देखील राहुल शेवाळे यांनी सांगितले.

प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?

राहुल शेवाळे यांनी केलेला हा दावा प्रियंका चतुर्वेदींनी खोडून काढला. तसेच प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे गटातील ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली.यामिनी जाधव, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक यांची कहानी माहिती असेलच, त्यामुळे यांच्याबाबत उत्तर यांनी दिलं तर मी मी चांगल्या उद्देशाने ऐकून घेईन, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर बोलताना प्रियंका म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा दिल्लीत गेलेत, त्या तुलनेत आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री किती वेळा जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच
तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समर्थन करण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करू नका असा हल्ला प्रियंका यांनी शेवाळे यांच्यावर चढवला.

ADVERTISEMENT

तुम्ही पाठीत खंजीर खुपसून सरकार बनवला आहात.तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीतही खंजीर खुपसला आहे,
राज्यातील जनतेला ही गोष्ट माहिती आहे, अशी टीका प्रियंका यांनी शेवाळेंवर केली. तसेच हे नेते आता सत्ता आणि शक्तीचा वापर करत असतील. पण 2024च्या निवडणूकीत त्यांचा पराभव होईल, असा अंदाज देखील प्रियंका चतुर्वेदी यांनी वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT