उदयनराजेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ‘ते’ प्रकरण आलं अंगलट
खिंडवाडीची वादग्रस्त जागा सर्वोच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात देऊन उदयराजेंना दणका दिला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तोडफोड करुन केलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून २ लाख १० हजार रुपये जमा केले.
ADVERTISEMENT
Udayan Raje Bhosale : एकाच पक्षात असले तरी साताऱ्यातील दोन राजांमधील वाद काही थांबलेले नाहीत. उदयनराजे भोसले विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजकीय कलगीतुरा होत असतो. काही दिवसांपूर्वी असेच दोन्ही राजे आमने-सामने आले होते. याच प्रकरणात आता उदयनराजे भोसलेंना सुप्रीम कोर्टात दणका बसला आहे. (Bjp Leader udayanraje bhosale big jolt in supreme court)
ADVERTISEMENT
साताऱ्यातील खिंडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जावेगवरुन खासदार उदयराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले समोरासमोर आले होते. यावेळी मोठा तणाव देखील निर्माण झाला होता. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उदयनराजेंना झटका दिला आहे. खिंडवाडीची वादग्रस्त जागा सर्वोच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात देऊन उदयराजेंना दणका दिला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तोडफोड करुन केलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून २ लाख १० हजार रुपये उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या खात्यावर जमा केल्याची माहिती समितीचे सभापती विक्रम पवार यांनी दिली आहे.
वाचा >> पाय धरले अन्… शरद पवार-अजित पवार भेटीत नेमकं काय झालं? त्या 20 मिनिटांची Inside Story
२१ जूनला साताऱ्यातील खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते. यासाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाची खासदार उदयराजे यांच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली होती. त्याचबरोबर कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनीही तिथे जाऊन तळ ठोकला होता. उदयराजे आणि पोलिसांच्या समोरच शिवेंद्रराजेंनी नारळ फोडत नूतन इमरतीचा भूमिपूजनाचा सोहळा पार पाडला होता.
हे वाचलं का?
वाचा >> Maharashtra CM : फडणवीसांना पहिली पसंती! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना ठरले भारी
खिंडवाडी येथील जागेच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. या सुनावणीमध्ये न्यायालयाने ही जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात देत उदयराजे यांना झटका दिला आहे. आता या जागेवर कृषी उत्पन्न समितीच्या नवीन इमारतीचे काम सुरु करणार असल्याची माहिती विक्रम पवार यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT