Lok Sabha 2024 : ठाकरेंच्या सेनेला 'मविआ'मध्ये 18 जागा, मतदारसंघही ठरले?
Lok Sabha 2024 election Seats :
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक 2024
18 लोकसभा मतदारसंघात नेमले निवडणूक समन्वयक
ठाकरेंकडून तयारी सुरू
Shiv Sena UBT Lok Sabha 2024 Seat : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कामाला लागले आहेत. बापलेक महाराष्ट्रात दौरे करत असून, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाकरेंनी 18 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक समन्वयक जाहीर केले आहेत. ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे, तिथे हे समन्वयक नेमण्यात आल्याने महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला 18 जागा मिळणार, असे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगाने घडामोडी घडत आहेत. निवडणूक जवळ येत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने राजकीय महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये काम सुरू केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून 18 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक समन्वय नेमण्यात आले आहेत.
मुंबईतील 2 जागा काँग्रेसला?
ठाकरेंकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक समन्वयकांची यादी बघितली, तर यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे. मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. पण, ठाकरेंनी चार लोकसभा मतदारसंघातच निवडणूक समन्वयक नेमले आहेत. त्याचबरोबर 48 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांसाठीच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या लोकसभा मतदारसंघामध्य बहुतांश जागा या शिवसेनेचे खासदार असलेल्या आहेत. यात काही मतदारसंघ मात्र नाहीत. जसं की, शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. त्याचबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडेच राहिलेला आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कुणावर?
जळगाव - सुनील छबुलाल पाटील
बुलढाणा - राहुल चव्हाण
रामटेक - प्रकाश वाघ,
यवतमाळ - वाशीम - उद्धव कदम
हिंगोली - संजय कच्छवे
परभणी - शिवाजी चोथे, संतोष सांबरे
जालना - राजू पाटील
संभाजीनगर - प्रदीपकुमार खोपडे
नाशिक - सुरेश राणे
ठाणे - किशोर पोतदार, सुभाष म्हसकर
मुंबई उत्तर पश्चिम - विलास पोतनीस
मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) - दत्ता दळवी
मुंबई दक्षिण मध्य - रवींद्र मिर्लेकर
मुंबई दक्षिण - सुधीर साळवी, सत्यवान उभे
रायगड - संजय कदम
मावळ - केसरीनाथ पाटील
धाराशीव - स्वप्नील कुंजीर
कोल्हापूर - सुनील वामन पाटील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT