Uddhav Thackeray : ''मी ढेकणांना...'', ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
Uddhav thackeray News : पुण्यात शिवसेना युबीटीचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी,अमित शाह यांच्यासह फडणवीसांवर चौफेर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तू बर्बादी करणारा आहेस

तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलो

ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis : ओंकार वाबळे, पुणे : राज्यात उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध रंगल आहे. या वाकयुद्धात आता पुन्हा एका उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना छेडलं आहे. मी ढेकणांना आव्हान देत नसतो, ढेकणे अंगठ्याला चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच आहेस, अशा शब्दात ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केली आहे. (uddhav thackeray criticize devendra fadnavis pune shiv sankalp melava maharashtra politics)
पुण्यात शिवसेना युबीटीचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी,अमित शाह यांच्यासह फडणवीसांवर चौफेर टीका केली आहे. एक तू राहशील की मी राहीन या ओळीचा ठाकरेंनी पुन्हा पुनरूच्चार करत 'तू बर्बादी करणारा आहेस, तू तर राहूच शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे, असा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिला आहे.
हे ही वाचा : Anil Deshmukh : "वाझेला हाताशी धरून फडणवीस...", हायकोर्टाचा निकाल दाखवत देशमुखांचा गंभीर आरोप
मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणे अंगठ्याला चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच आहेस, असा हल्ला देखील ठाकरेंनी फडणवीसांवर चढवला.
मुख्यमंत्री असताना आजवर मी पुण्याच्या कामात दाखल नाही दिली. कारण बसला होता इथला सुभेदार! पण जेव्हा सत्ताबदल झाला तेव्हा गोष्टी समोर आल्या, अशा शब्दात नाव न घेता ठाकरेंनी अजित पवारांना देखील टोला हाणला.