Uddhav Thackeray: ‘आमच्याकडचे राज्यपाल कसे मस्ती करायचे, त्यांना..’, मणिपूरवरून जहरी टीका

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray criticized Prime Minister Modi on Manipur issue in a speech in Thane. Along with this, he advised that Bhagat Singh Koshyari should be sent to Manipur as Governor.
Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray criticized Prime Minister Modi on Manipur issue in a speech in Thane. Along with this, he advised that Bhagat Singh Koshyari should be sent to Manipur as Governor.
social share
google news

Uddhav Thackeray  Criticized PM Modi on Manipur: ठाणे: मणिपूर (Manipur) हिंसाचार आणि महिलांची केलेली विंटबना या मुद्द्यावरुन अवघ्या देशभरातून मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली जात आहे. यावरुनच शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी आज (29 जुलै) ठाण्यातील (Thane) एका जाहीर कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींवर (PM Modi) अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना मणिपूरला पाठवा. असं म्हणत भाजपला जोरदार चिमटा काढला. (uddhav thackeray criticized pm modi on manipur in thane speech. he advised that bhagat singh koshyari should be sent to as a governor)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी मणिपूरच्या मुद्दयावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवलाच. पण याचवेळी ते असंही म्हणाले की, दोन दिवसांनी पंतप्रधान महाराष्ट्रात येणार असून ते गद्दारांसोबत बसणार आहेत. ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं त्यांचा ते सत्कारही करणार आहेत. अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे. पाहा आपल्या ठाण्यातील भाषणात ठाकरेंनी नेमका कोणाकोणावर निशाणा साधला.

‘आमच्याकडे जे राज्यपाल होते कसे मस्ती करायचे.. पाठवा त्यांना तिकडे’

‘मणिपूर जे जळत आहे तेच आपलं हिंदूराष्ट्र का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा.. हनुमान चालीसा.. असं सुरू होतं. अरे ज्या हनुमानानने एका सीतेसाठी लंकेचं दहन केलं.. सीताहरण झालं म्हणून रामायण झालं. आज तिथे जे सरकार आहे ते काय धृतराष्ट्र आहे?’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले

‘आपल्याच देशात मणिपूरमध्ये ज्या दोन महिलांसोबत जे केलं गेलं ते फक्त व्हिडीओ समोर आला म्हणून आपल्याला समजलं. तेथील मुख्यमंत्री म्हणतात की, अशा घटना खूप झाल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राष्ट्रपती महिला आहेत. त्या देखील आदिवासी आहेत. त्या काय करत आहेत?’

‘मी त्यांना विचारतोय.. आपण ज्या देशाच्या राष्ट्रपती आहात त्या देशात महिलांची इज्जत लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत? तिथल्या राज्यपाल या देखील महिला आहेत. त्या देखील काहीही करत नाहीत. अरे आमच्याकडे जे राज्यपाल होते कसे मस्ती करायचे.. पाठवा त्यांना तिकडे.’

‘मंदिरं सुरू करा, हे सुरू करा.. एवढं सोप्पं होतं का ते कोरोनाचं संकट? असे राज्यपाल तिकडे का नाही पाठवत? मी तर म्हटलं होतं की, INDIA ची एकजूट झाली त्याचीही पंतप्रधानांनी खिल्ली उडवली.’

ADVERTISEMENT

‘आता महिलांची इज्जत कोण वाचवणार? जे संपूर्ण देशात ताकदवान नेते आहेत विश्वगुरू आहेत, महाशक्तीचा बाप.. त्यांच्या राजवटीत महिलांची अब्रू लुटली जात आहे. कोण वाचवेल या माता-भगिनींना?’ असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर टीकेची झोड उठवली.

ADVERTISEMENT

‘बनावट, बोगस, गद्दार..’, शिंदेंवर ठाकरेंनी पुन्हा साधला निशाणा

‘ज्यांना असं वाटतं की, मी म्हणजे ठाणे… नाही ठाणे आणि शिवसेना आणि ती देखील खरी शिवसेना.. खरं या शब्दाचा मी यासाठी वापर केला की, आता मार्केटमध्ये चायनीज माल देखील येतो. फक्त मालच नव्हे देवाच्या मूर्ती देखील यायच्या.. पण त्यालाच आपण देव समजून पूजा करायचो. असे काही चायनीज लोक बनावट, बोगस, गद्दार जे स्वत: समजतात की, मी शिवसेनेपेक्षाही मोठा आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.

‘मी काँग्रेससोबत खुलेआम गेलो, रात्री लपूनछपून…’

‘मी काँग्रेससोबत गेलो.. हो गेलो खुलेआम गेलो.. अर्ध्या रात्री लपूनछपून बैठका नाही केल्या. पण मी सवाल त्यांनाही विचारतो की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्यासाठी कोणी भाग पाडलं? मला ऑपरेशनमुळे पट्टा लावावा लागतो हे खरंय. पण तसा पट्टा कोणी माझ्या गळ्यात कोणी बांधू शकत नाही आणि कोणी जन्मलाही आला नाही. माझ्या नसनसात बाळासाहेबांचं रक्त आहे. मी कधी लाचार किंवा गुलाम होणार नाही.’

हे ही वाचा >> मुंबई Tak Chavadi: ‘पंकजाताईंना कोणीही संपवत नाहीए’, धनंजय मुंडेंनी फडणवीसांना घातलं पाठिशी?

‘आता एक-दोन दिवसात पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात येणार आहे. ते गद्दारांसोबत बसणार आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच तुमचं हिंदुत्व आहे?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT