उद्धव ठाकरेंनी नाशिक सोडून मालेगावच का निवडलं? काय आहे राजकीय रणनीती?
शिवसेना आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असून ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.
ADVERTISEMENT

Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray rally :
– प्रविण ठाकरे
नाशिक : कोकणमधील खेडनंतर आता शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (रविवारी) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होणार आहे. शिवसेना आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असून ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. (Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray rally in malegaon, nashik)
पण ठाकरे गटाने ही सभा मालेगावमध्ये का नियोजित केली?
एकेकाळी उत्तर महाराष्ट्र शिवसेनेचा गड होता, नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे, माजी महापौर अजय बोरस्ते, तर नाशिक ग्रामीणमध्ये निफाड, नांदगाव, सिन्नर, मालेगाव बाह्य असे आमदार होते. पण फूट पडल्यानंतर नाशिक उद्धव ठाकरेंच्यामागे उभे होते, पण सर्वात शेवटी खिंडार हे नाशिकला पडले , एक आमदार, एक मंत्री, आणि खासदार आता शिंदेंच्या बाजूने आहेत, जळगावचे गुलाबराव पाटील तर धुळे येथील शहर कार्यकारणीही थेट शिंदेंसोबत गेली.
युतीच्या जागा वाटपावरून सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेत्याला सुनावलं!
आजचे सभास्थळ हे दादा भुसे यांच्या मतदार संघ आहे, तर अवघ्या काही अंतरावर दादा भुसे यांचे घर, शेजारी सुहास कांदे यांचा मतदार संघ आणि एक बाजूला धुळे आहे. त्यामुळे आठ ते दहा विधानसभा मतदार संघ, नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या सभेत सहभागी होतील. याच भागात ठाकरे गटाचे कोणतेही प्रभावी नेते नाहीत. ज्यामुळे या भागात कार्यकर्ते आणि नेते तयार करत मतदारसंघ मजबूत करण्यासाठी आजची सभा महत्वाची आहे. मराठवाडा, मुंबई आणि कोकण पाहता ठाकरे गट उत्तर महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत झाला आहे.