PM cares Fund: ‘वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठं’, उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
social share
google news

कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, पण पीएम केअर फंडातल्या पैशाचे काय झालं हे देखील जनतेला कळले पाहिजे. वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे? असा हास्यजत्रा स्टाईलमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना सवाल केला आहे. तसेच मुंबईच्या लढ्याचे जगात कौतुक होत असताना,त्याला अपशकुनी करणाऱ्या या अपशकुनी मामांचा विचार करण्याची वेळ आलीय, असा इशाराच ठाकरेंनी यावेळी दिला. (udhhav thackeray criticized pm narendra modi on pm care fund mahashtra politics)

उद्धव ठाकरे लोकमत समुहाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ठाकरेंनी शिंदेपासून, अजित पवार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. संघर्ष यात्री…, यात्री खूप असतात, तसेच टुर्स अॅड ट्रॅव्हल्स वाले पण खुप आहेत. सुरत, गुवाहाटी वगैरे खुप प्रवास होतो, असा भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चिमटा काढला. तसेच आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, माझ्या तर आता मनातही नाही आहे. पण हल्ली ज्याने घडवलं आहे तो शिल्पकारच पळवण्याचा प्रयत्न झाला आहे, असा टोला ठाकरेंनी अजित पवारांना लगावला आहे. पण पद येतातत, पद जातात, पण त्यांच्यानंतर माणूस म्हणून जी ओळख असते. ती ओळख फार महत्वाची असते, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार ? शरद पवार म्हणाले…

कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, पण कोरोनाने ग्रासल असताना मुंबईने जगासमोर एक आदर्श ठेवला होता. जगाने त्याचे कौतूक केले होते. पण जग कौतुक करत असताना, तुमच्यात कौतुक करण्याइतपतं मोठेपण हवा ना. दुसरा जर चांगल करत असेल तर, चांगल्या चांगले म्हणायला माणुसकी लागते. पण जर आपल्यातला माणूसच मेला असेल, तर कौतूकाची अपेक्षाच नाही,अशी टीका देखील ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तसेच कौतुक करता येत नसेल तर बदनामी तरी करू नका, असे देखील ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पीएम केअर फंडातील जनतेच्या पैशाचे काय झाले, हे देखील कळले पाहिजे, हा पैसा घेतला कोणी होता आणि वापरला कशासाठी होता. लाखो-करोडो रूपये तिकडे गोळा केले गेले. हा घोटाळा नाही होऊ शकत. आता म्हणतात तो पीएम केअर फंड सरकारी नाही, मग नेमका आहे कुणाचा? असा सवाल देखील ठाकरेंनी केला. पीएम केअर म्हणजे मी मध्ये बोललो होतो, प्रभाकर मोरे फंड आहे का? ‘वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे?’ असा तो फंड आहे का, तर तसाही नाही आहे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत. एकमेकांची उनीधुनी काढण्यापेक्षा, एकत्र भारत म्हणून जो लढा दिला.त्यात मुंबईचे जगात कौतुक होत असताना, त्याला अपशकुनी करणाऱ्या या अपशकुनी मामांचा विचार करण्याची वेळ आली आहे,असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : NCP: अजितदादांचं बंड, पवारांसोबत सावली सारखे राहणाऱ्या रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी!

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT