Milind Deora : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

why did milind deora quit congress and joined eknath shinde
why did milind deora quit congress and joined eknath shinde
social share
google news

Milind Deora in Shiv Sena : “माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबत असलेलं 55 वर्षांचं नातं संपवत आहे”, असे सांगत माजी खासदार मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहून देवरा इथून पुढील राजकारण करणार आहे. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा जिथे समारोप होणार आहे, त्याच मुंबईतील एक नेता पक्षातून बाहेर पडला आहे. त्यामुळे मिलिंद देवरांच्या राजीनाम्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. देवरांच्या या निर्णयामागे वेगळा प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे. देवरा काँग्रेसमधून शिवसेनेत येण्याचं कारणच समजून घ्या… (who is Milind Deora and why he is joined Eknath Shinde’s Shiv Sena?)

राहुल गांधी यांच्या कोअर टीमचा भाग राहिलेल्या नेत्यांपैकी एक असलेले मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडले. मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मुरली देवरा यांचे सूपुत्र आहेत. मिलिंद देवरा सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. पण, आगामी लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा लपून राहिली नाही.

दक्षिण मुंबई लोकसभा ठरला कळीचा मुद्दा

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. पण, २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. दोन्ही वेळा शिवसेनेचे अरविंद सावंत जिंकून आले. त्यामुळेच या मतदारसंघावरील ठाकरे गटाचा दावा प्रबळ झालेला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर मिलिंद देवरांनी विरोध केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘या’ पाच कारणांमुळे ठाकरेंच्या विरोधात लागला निकाल!

जागावाटपा आधी ठाकरे गटाने अशा पद्धतीने विधाने करू नये असे सांगत देवरा यांनी मतदारसंघावर आपला दावा अप्रत्यक्षपणे केला होता. पण, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच जाण्याची कल्पना आल्यानंतर देवरांनी पुढचा राजकीय निर्णय घेतला.

मिलिंद देवरा राज्यसभेवर जाणार?

मुंबईतील लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल, अशा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. देवरा हे ज्या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत, त्या मतदारसंघातून भाजप उमेदवार देणार असल्याचे म्हटले जात आहे. मिलिंद देवरा यांना पक्षात घेतल्याने शिंदे या जागेवर दावा करू शकतात. पण, या लोकसभा मतदारसंघातून भाजपतील अनेकजण इच्छुक आहेत. त्याचबरोबर ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपचे आहे. त्यामुळे भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंच्या सहीचा AB फॉर्म शिंदेंना कसा चालला? नार्वेकर म्हणाले…

महत्त्वाचं म्हणजे भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. भाजप लोकसभेला ३० जागांवर उमेदवार देणार असल्याची म्हटले जात आहे. त्यामुळे मिलिंद देवरांना लोकसभेचं तिकीट मिळेल, याबद्दल साशंकता आहे. पण, या वर्षी राज्यसभेच्या काही जागा रिक्त होताहेत. यात शिंदेंच्या शिवसेनेला एक खासदार राज्यसभेत पाठवता येणार आहे.

ADVERTISEMENT

मिलिंद देवरा हे लोकसभेऐवजी राज्यसभेत जातील असेच दावा केला जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देवरा यांनी काँग्रेसमध्ये असतानाच राज्यसभेसाठी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केले होते, पण काँग्रेसने आधी कुमार केतकर आणि नंतर इमरान प्रतापगढ़ी यांना पाठवलं होतं. त्यामुळे शिंदेंच्या सेनेतून देवरा राज्यसभेत जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितलं जात आहे.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सूपुत्र आहेत. मिलिंद देवरा यांनी मुंबईतूनच राजकारणाची सुरूवात केली. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मुरली देवरांचा दबदबा होता. 1984, 1996, 1998 मध्ये मुरली देवरा या मतदारसंघातून विजयी झाले होते.

मिलिंद देवरा हे याच मतदारसंघातून २७ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. २७व्या वर्षी देवरा मुंबई दक्षिण मधून उभे राहिले आणि लोकसभेत पोहोचले. त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा पराभव केला होता. काँग्रेस प्रणित पहिल्या युपीए सरकारमध्ये ते संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य बनले. २००६ मध्ये शहर विकास मंत्रालयाच्या समितीचे सदस्यही ते झाले.

हेही वाचा >> शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राहुल नार्वेकरांनी कायदाच सांगितला

२००९ मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. जुलै २०११ मध्ये मिलिंद देवरा यांना युपीए २ सरकारमध्ये केंद्रीय प्रसारण राज्य मंत्री बनवण्यात आले. २०१२ मध्ये जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

मिलिंद देवरा यांचं शालेय शिक्षण कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॉनन स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी बॉस्टन विद्यापिठाशी संलग्नित क्वेस्ट्रॉम स्कूल ऑफ बिझनेस मधून बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतलेली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT