Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

why did education minister deepak kesarkar suddenly go to bjp minister narayan rane house what was given to Rane from that bag
why did education minister deepak kesarkar suddenly go to bjp minister narayan rane house what was given to Rane from that bag
social share
google news

Deepak Kesarkar Meet Narayan Rane in Kankawali: कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोडी काल (27 नोव्हेंबर) घडली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. कणकवली येथील ‘ओम गणेश’ बंगल्यावर जाऊन केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. यावेळी केसरकरांनी राणेंना एका बॅगेतून काही भेटवस्तू देखील दिल्या. (why did education minister deepak kesarkar suddenly go to bjp minister narayan rane house what was given to Rane from that bag)

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे केसरी जत्रेसाठी येणार होते. मात्र, त्यांचं चार्टर्ड विमान असल्यामुळे खराब हवामानामुळे त्याचं उड्डाण होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर, 27 नोव्हेंबरला दीपक केसरकर हे पहाटे सहा वाजता संभाजीनगर येथून मोपा विमानतळ येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी केसरी येथे जत्रेच्या निमित्ताने स्वयंभू देवाचे दर्शन घेतलं. पण तिथून केसरकरांनी थेट कणकवली गाठली आणि ते चक्क नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर दाखल झाले. राणे आणि केसरकर यांच्या याच भेटीमुळे सर्वांच्याचा भुवया उंचावल्या आहेत.

राणे-केसरकरांमधलं नेमकं वैर काय होतं?

राणे-केसरकर ही राजकीय भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे. कारण, 2009 मध्ये दीपक केसरकर आमदार झाल्यानंतर नारायण राणे यांच्याशी दोन-तीन वर्ष सलोख्याचे संबंध होते. मात्र, नारायण राणे 2009 ते 2014 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर हे 2009 मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुरुवातीच्या दोन-तीन वर्षात दोघांमध्ये चांगले संबध होते. मात्र, यानंतर या दोघांमध्ये राजकीय खटके उडायला सुरुवात झाली. ‘मी सुद्धा पालकमंत्री होऊ शकतो.’ अशा प्रकारचे विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं आणि 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दीपक केसरकर हे राणेंविरोधात बंड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. दीपक केसरकर यांना पराभूत करण्यासाठी नारायण राणेंनी काँग्रेसचे उमेदवार बाळा गावडे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली होती. यावेळी राणेंनी केसरकरांना शिकस्त देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला पण दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena: ‘तिकडे प्रचाराला जाता.. लाज नाही वाटत?’, उद्धव ठाकरे CM शिंदेंवर का भडकले?

2014 साली युतीची सत्ता आली आणि दिपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. प्रत्येक वेळी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यामध्ये असलेली दुफळी संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाली होती.

ADVERTISEMENT

2019 ला पुन्हा दीपक केसरकर हे विधानसभेवर निवडून गेले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिपद दिलं नाही. पण गेल्या वर्ष दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ता नाट्यानंतर दीपक केसरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या बंडानंतर ते अक्षरश: एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातले ताईत बनले. आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते झाले. याशिवाय शालेय शिक्षण मंत्री पदही त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले.

सध्या राणे हे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. तर दीपक केसरकर महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी राजकारणात अनेक वेळा चढउतार पाहिले. मात्र दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात तसं मनोमिलन कधी झालं नाही. परंतु सध्या हे दोन्ही मंत्री सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. दीपक केसरकर यांनी कोणत्याही परिस्थितीत राणे यांच्या घराची पायरी चढणार नाही. अशा प्रकारची विधानं केली होती. तसेच दहशतीचा मुद्दाही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच तापवला होता.

हे ही वाचा>> MLA Disqualification Case : 2019 चा ठराव, उद्धव ठाकरेंचा अधिकारच धोक्यात! सुनावणीत काय झालं?

अशा परिस्थितीत आता दीपक केसरकर हे नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी गेल्याने त्यांच्या विरोधकांना आता आयतेच कोलीत मिळाले आहे. दरम्यान, या भेटीनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक,खासदार विनायक राऊत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, मनसेचे जी.जी.उपरकर, राष्ट्रवादीचे अमित सामंत, अर्चना घारे,अतुल बंगे, रुपेश राऊळ,सुशांत नाईक हे यावर काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणं फार औत्सुक्याच ठरणार आहे. मात्र ही राजकीय भेट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलत असल्याचं चिन्ह आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT