अमित शाहांसोबतचे 'ते' दोन फोटो शिंदेंनी का केले नाही शेअर?, अचानक निघून गेले गावी!
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यासाठी अमित शाहा यांच्यासोबत दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीचे दोन फोटो हे समोर आले. पण एकनाथ शिंदे यांनी हे दोन्ही फोटो कुठेही शेअर केले नाही. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज?

अमित शाहांसोबतच्या बैठकीचे फोटोही केले नाही शेअर

शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण
Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्यापही कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. काल (28 नोव्हेंबर) रात्री उशिरा महायुतीच्या तीनही नेत्यांची अमित शाहांसोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. ज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. याच बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच बैठकीतील दोन फोटोही समोर आले होते ज्यामध्ये शिंदे हे निर्विकारपणे उभे असल्याचे दिसून आले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही फोटो आपआपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. पण शिंदेंनी हे फोटो कुठेही शेअर केलेले नाही. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमित शाह यांच्या घरी जी बैठक पार पडली त्याआधी शिंदेंनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. जे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं. पण त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत जी बैठक झाली त्याचा एकही फोटो त्यांनी शेअर केलेला नाही. या फोटोमध्ये शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा>> Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?
याच बैठकीनंतर शिंदेंना या फोटोबाबतही विचारणा करण्यात आली. पण आपण नाराज नसल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं. पण असं असताना आज (29 नोव्हेंबर) अचानक ते आपल्या साताऱ्यातील दरे गावी निघून गेले. खरं तर एकनाथ शिंदे यांची महायुतीच्या नेत्यांसोबत एक बैठक पार पडणार होती. पण ही अचानक ही बैठक रद्द करून शिंदे हे गावी निघून गेले.
एकीकडे मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय त्यांना अपेक्षित असणारं गृहखातं देखील भाजप सोडणार तयार नसल्याचे शिंदेंची नाराजी वाढलं असल्याचं बोललं जात आहे.