MNS:रस्ते, टोल.. अन् कोकणी माणूस.. राज ठाकरेंनी टार्गेट का बदललं, मनात नेमकं काय?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest
why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest
social share
google news

Raj Thackeray: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्ड्यांवरून भाजपला (BJP) टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मनसेच्या नेत्यांनी यासाठी नुकतीच जागर यात्रा देखील काढली होती. राज ठाकरेंच्या भाषणानं जागर यात्रेचा समारोप देखील झाला. यावेळीही राज ठाकरेंनी भाजपसह शिवसेनेवर टीका केली. पण, आधी वेगळ्या मुद्द्यांवरून खळखट्याक करणाऱ्या मनसेचं टार्गेट बदललंय का? नाशिक दौरे करणाऱ्या राज ठाकरेंनी कोकण (Konkan) आणि पुण्याची (Pune) वाट का धरली आहे? मुंबई-गोवा महामार्गावरील पदयात्रेमधून राज ठाकरेंना काय साध्य करायचं? हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. (why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest)

ADVERTISEMENT

एक काळ असा होता की संपूर्ण नाशिक महापालिका मनसेच्या ताब्यात होती. 2012 ला नाशिक महापालिकेत मनसेकडे 40 जागा होत्या. पण, त्या जागा मनसेला टिकवता आल्या नाही आणि 2017 मध्ये मनसे 40 जागांवरून थेट 5-7 जागांवर आली. त्यामुळेच की काय राज ठाकरे नाशिकला दौरे करायचे. पण, इतक्यात राज ठाकरेंनी कोकण आणि पुण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलेलं दिसतंय.

हे ही वाचा >> CM Shinde Vs Ajit Pawar: अजित पवारांमुळे मुख्यमंत्र्यांचा ‘इगो’ दुखवला? फाईलींचा प्रवासच बदलला…

मनसेनं याआधी टोल-नाक्याच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता. पण, यंदा मात्र राज ठाकरेंनी त्यांचा दौरा कोकणाकडे वळवला असून ते आता मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत.

हे वाचलं का?

फक्त बोलतच नाही तर चक्क स्वतःच्या मुलापासून तर मनसेच्या नेत्यांना त्यांनी पायी चालायला लावलं. मनसेची जागर यात्रा नुकतीच पार पडली. यात अमित ठाकरे, नितीन सरदेसाईंपासून मनसेचे 9 नेते मुंबई-गोवा महामार्गावरून पायी चालताना पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या भाषणानं मनसेच्या जागर यात्रेचा समारोप झाला. यावेळी राज ठाकरेंनी भाजप-सेनेच्या आमदार-खासदारांवर टीका केली. आपण त्याच त्या पक्षाच्या लोकांना निवडून देतो असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा मोर्चा अचानक कोकणाकडे कसा वळला?

भोंग्यांच्या मुद्द्यावर खळखट्याक करणारी मनसे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर इतकी आक्रमक का झाली? हे समजून घेऊयात. राज ठाकरेंनी कोकणावर फोकस करण्याचं कारण सांगितलं जातं. ते म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट. आधीपासून कोकण पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आताही कोकणात सर्वाधिक शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत. पण, कोकणातील पाच आमदार शिंदेंसोबत गेले आणि तीन आमदार ठाकरेंसोबत राहिले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही तर चोऱ्यामाऱ्या..’, सामनातून ठाकरेंची घणाघाती टीका

कोकणात शिवसेनेची ताकद विभागली गेलीय. याचाच फायदा घेत कोकणातला मराठी माणूस आपल्याकडे वळवता येईल का? त्याचं मनपरिवर्तन करता येईल का? या दृष्टीनं राज ठाकरे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे कोकणातला मराठी माणूस मोठ्या प्रमाणात मुंबईत दिसतोय. शिवसेना फुटीचा फायदा घेत कोकणात मनसेचा बेस तयार झाला, कोकणातल्या मराठी माणसाचा विश्वास जिंकणं मनसेला शक्य झालं तर त्याचा फायदा हा मुंबई महापालिका आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत होऊ शकतो. त्यासाठीच राज ठाकरेंनी कोकणाकडे मोर्चा वळवल्याचं बोललं जातं आहे.

ADVERTISEMENT

पुण्याकडे राज ठाकरेंचं अधिक लक्ष, मनात नेमकं काय?

कोकणापाठोपाठ राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा वळवलाय तो पुण्याकडे. कधी राज ठाकरे पुण्यातल्या ट्रॅफिकवरून, तर कधी पुण्यात वाढलेल्या गर्दीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना दिसतात. अनेकदा पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावतात, तर कधी फक्त मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी पुणे दौरा करतात. त्याचं कारण म्हणजे, आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यावर मनसेचा फोकस दिसतो.

पुण्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना राम राम ठोकला. यात महत्वाचं नाव म्हणजे रुपाली पाटील ठोंबरे. दुसरीकडे वसंत मोरेही नाराज असल्याच्या चर्चा असतात. पुणे महापालिकेच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांची नाराजी मनसेला परवडणारी नाही. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी राज ठाकरेंचा पुणे दौरा वाढल्याचं बोललं जात आहे. पण, राज ठाकरेंच्या या भूमिकांमुळे त्यांना खरंच यश मिळतं का? हे बघणं महत्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT