Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकर ठाकरेंवर संतापले, टार्गेट का करतायेत?
Uddhav Thackeray Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. त्यामागचे राजकारण काय?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक
उद्धव ठाकरेंच्या विधानावर आंबेडकर संतापले
Prakash Ambedkar Uddhav Thackeray : महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याबद्दल तीन पक्षाच्या नेत्यांनी आभार मानले. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनीही आभार मानले. आता ठाकरेंच्याच एका विधानावर बोट ठेवत प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला. त्यामुळेच आंबेडकर अचानक उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला लागले आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. (why did Prakash Ambedkar Criticised to uddhav Thackeray)
ADVERTISEMENT
"गरज सरो वैद्य मरोचे उत्तम उदाहरण उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही! घरात आहे पीठ"
हे ट्विट आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं. या ट्विटमधून प्रकाश आंबेडकर यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हे करत असताना जो हॅश टॅग वापरला तो देखील दखल घेण्यासारखा आहे. #घरात आहे पीठ... हा हॅशटॅग वापरण्यामागे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा संदर्भ आहे. त्याचबरोबर त्या वेळेला शिवसेनेने बाबासाहेबांच्या नावाला कसा विरोध केला हे देखील आंबेडकरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हे वाचलं का?
प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंवर टीका
आंबेडकरांनी ठाकरेंना उद्देशून ट्विट करण्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंशी मैत्री करणाऱ्या आंबेडकरांनी असा यु टर्न घेत आपल्या मित्रावरच असे आरोप का केले? प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना का टार्गेट करतायेत? हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे.
हेही वाचा >> 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, ठाकरे-पवारांची विधानसभेपूर्वी 'परीक्षा'?
आंबेडकरांनी जे ट्विट केलं आहे त्याची पार्श्वभूमी देखील समजावून घेणं गरजेचं आहे. नुकताच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध समाज घटकांचे आभार मानले. याबाबतचं एक कार्डदेखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. यात ठाकरेंनी सर्व समाजांचा उल्लेख केला आहे परंतु दलित आणि बौद्ध समाजाचा यात उल्लेख दिसत नाही. या पोस्टवरुनच आंबेडकरांनी ठाकरेंना घेरलं आहे.
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकरांना काय साधायचे आहे?
या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे मविआसोबत राहतील असं म्हटलं जात होतं. मविआसोबत त्यांच्या बैठका देखील झाल्या परंतु जागा वाटपावरुन बोलणी फिस्कटली आणि आंबेडकरांनी एकला चलो रेचा नारा दिला. निवडणुकींच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्याचबरोबर २०१९ च्या निवडणुकीत जेवढं मतदान वंचित बहुजन आघाडीला झालं होतं, त्यातही मोठ्याप्रमाणावर घट झाली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ईव्हीएम खरंच हॅक केलं जाऊ शकतं? तज्ज्ञ काय म्हणतात...
मुंबईत खास करुन दलित, बौद्ध आणि मुस्लिम मतं ही ठाकरेंच्या बाजूने गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका हा वंचित बहुजन आघाडीला देखील बसला. त्यामुळे आंबेडकरांचा कोअर वोटर हा येत्या विधानसभेत देखील दुरावेल की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
आंबेडकरांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र साठे म्हणाले,
"या निवडणुकीत वंचितला मोठा दणका बसला. गेल्या निवडणुकीत मिळालेली ४३ लाख मतं यंदा मात्र १५ लाखांपर्यंत खाली आहे. वंचितला त्यांच्या हक्काच्या मतदारांनी नाकारलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या मतदारांना आवाहन करायचा प्रयत्न करत आहेत. आता दलित आणि मुस्लिम मतदार जागृत झाला आहे. यंदाचं मतदान हे विचार करुन करण्यात आलेलं मतदान आहे, या गोष्टी लक्षात न घेता आंबेडकर असे ट्विट करत आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्याबाबत आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेकडे त्यांच्याशी जोडलेले छोटे ओबीसी पाहत होते. त्यामुळे त्याचा देखील फटका आंबेडकरांना बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दलित मतदाराला गृहीत धरता येणार नाही हे देखील मतदारांनी स्पष्ट केलं आहे."
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेतील पराभवानंतर वंचितकडून पक्ष बांधणीवर भर देण्यात येत आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचं विश्लेषण देखील त्यांच्या पक्षाकडून करण्यात येत आहे. आता येत्या काळात प्रकाश आंबेडकर मविआसोबत जातात की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT