मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांना बजावली नोटीस, पण…
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे याबाबत लेखी उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची नोटीस बजावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis: नवी दिल्ली: शिवसेना (UBT) नेते सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या सुनावणीबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या आमदारांविरोधात प्रलंबित अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
कोर्टाची अध्यक्षांना नोटीस याचा अर्थ निकाल तात्काळ द्या असा नाही..
16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षाना नोटीस बजावण्यात आली आहे. 11 मे 2023 रोजी सत्तासंघर्षाचा निकाल लागला.. त्यानंतर या संदर्भात अद्यापही अपात्रतेची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्या अशी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली होती. आज सुप्रीम कोर्टाने याबाबत असं म्हटलं की, याबाबत आपण विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावू आणि याचं लेखी उत्तर मागवू असं म्हटलं आहे.
मुळात काय प्रक्रिया सुरू आहे त्यासंदर्भात लेखी उत्तर देण्यासाठी ही नोटीस कोर्टाने बजावली आहे. या दोन आठवड्यांच्या नोटीसचा अर्थ असा नाही की त्यांना काही कालमर्यादा आहे. पण अपात्रतेची जी याचिका आहे त्यामध्ये नेमकी काय प्रगती आहे याविषयी अध्यक्षांना कोर्टाला लेखी उत्तर द्यायचं आहे. हेच उत्तर देण्यासाठी अध्यक्षांकडे 2 आठड्याचा वेळ असणार आहे.










