उद्धव ठाकरेंचा राजीनामा की एकनाथ शिंदेंचं बंड? काय असेल राज ठाकरेंचं नवं कार्टून?
महाराष्ट्रात सत्तानाट्य घडून एक महिना पूर्ण झाला आहे. २१ जूनच्या एक दिवस आधी विधान परिषदेचे निवडणूक निकाल होते. या निकालांमध्ये भाजपचे पाच आमदार निवडून आले. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्यासोबत एक दोन नाही तर तब्बल चाळीस आमदार गेले. तर ११ अपक्ष आमदारांची साथही त्यांना लाभली. आता राज ठाकरे या सगळ्या विषयी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सत्तानाट्य घडून एक महिना पूर्ण झाला आहे. २१ जूनच्या एक दिवस आधी विधान परिषदेचे निवडणूक निकाल होते. या निकालांमध्ये भाजपचे पाच आमदार निवडून आले. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्यासोबत एक दोन नाही तर तब्बल चाळीस आमदार गेले. तर ११ अपक्ष आमदारांची साथही त्यांना लाभली. आता राज ठाकरे या सगळ्या विषयी व्यंगचित्र काढत आहेत.
आपलं सरकार अल्पमतात आलंय हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
राज ठाकरेंचं नवं कार्टून नेमकं असणार तरी काय?
या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान राज ठाकरे यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. त्यांनी दोन्ही नेत्यांचं पत्र पाठवून अभिनंदन केलं. आता राज ठाकरे नवं व्यंगचित्र काढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यावर त्यांचं व्यंगचित्र येणार का? उद्धव ठाकरेंचा राजीनामा, एकनाथ शिंदेंचं बंड, देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्रीपद असं त्या व्यंगचित्रात असेल? हे सध्या तरी राज ठाकरेंनाच ठाऊक आहे. तसंच हे एक व्यंगचित्र असेल की त्यापेक्षा जास्त? या प्रश्नाचं उत्तरही राज ठाकरेंनाच ठाऊक आहे. राज ठाकरे हे सध्या नवं कार्टून काढत आहेत.