Uniform civil code : ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंच्या हाती ‘UCC’, व्हीप काढणार
समान नागरी कायाद्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेतली.
ADVERTISEMENT

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : समान नागरी कायाद्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सुतोवाच केले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मात्र बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर येत आहे. खरे पाहत उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या भुमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटीबध्द आहे”, असं सांगत खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंवर पहिला हल्ला आज चढावला.
शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेतली.
शेवाळे म्हणाले, “आजचा हा दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भाजपच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे.”
हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
“राम मंदिर निर्माण, कलम 370 रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची 3 स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत. समान नागरी कायदा लवकरच येईल”, असे शेवाळे यांनी सांगितलं.
“शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले.










