LIVE- राज्यसभेची निवडणूक होणारच, कुणीही प्रस्ताव घ्या कुणी समजून घ्याची वेळ संपली

मुंबई तक

महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी एक तासभर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊन आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठी ची दुसरी जागा मागे घ्या आणि विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही त्यानंतर कुठलाच संवाद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी एक तासभर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊन आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठी ची दुसरी जागा मागे घ्या आणि विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही त्यानंतर कुठलाच संवाद माहाविकास आघाडीकडून झाला नाही.वेगळ्या बातम्या कानावर येत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. कुणी प्रस्ताव घ्या कुणी समजून घ्या ही सकाळपासून सुरू असलेली खेळी निष्प्रभ ठरली आहे. आज सकाळी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी 6 वाजता वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेस एनसीपी नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत. राज्यसभेची निवडणूक अटळ आहे हाच या सगळ्याचा अर्थ निघतो आहे. बाळासाहेब थोरात यांनीही ही माहिती दिली आहे.

भाजपच्या नेत्यांशी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की भाजप आता माघार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असं वाटलं होतं. मात्र तसं होणार नाही असं भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp