Milind Deora : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?
Milind Deora Political Career : मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. पण, २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले.
ADVERTISEMENT

Milind Deora in Shiv Sena : “माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबत असलेलं 55 वर्षांचं नातं संपवत आहे”, असे सांगत माजी खासदार मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहून देवरा इथून पुढील राजकारण करणार आहे. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा जिथे समारोप होणार आहे, त्याच मुंबईतील एक नेता पक्षातून बाहेर पडला आहे. त्यामुळे मिलिंद देवरांच्या राजीनाम्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. देवरांच्या या निर्णयामागे वेगळा प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे. देवरा काँग्रेसमधून शिवसेनेत येण्याचं कारणच समजून घ्या… (who is Milind Deora and why he is joined Eknath Shinde’s Shiv Sena?)
राहुल गांधी यांच्या कोअर टीमचा भाग राहिलेल्या नेत्यांपैकी एक असलेले मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडले. मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मुरली देवरा यांचे सूपुत्र आहेत. मिलिंद देवरा सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. पण, आगामी लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा लपून राहिली नाही.
दक्षिण मुंबई लोकसभा ठरला कळीचा मुद्दा
मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. पण, २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. दोन्ही वेळा शिवसेनेचे अरविंद सावंत जिंकून आले. त्यामुळेच या मतदारसंघावरील ठाकरे गटाचा दावा प्रबळ झालेला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर मिलिंद देवरांनी विरोध केला.
हेही वाचा >> ‘या’ पाच कारणांमुळे ठाकरेंच्या विरोधात लागला निकाल!
जागावाटपा आधी ठाकरे गटाने अशा पद्धतीने विधाने करू नये असे सांगत देवरा यांनी मतदारसंघावर आपला दावा अप्रत्यक्षपणे केला होता. पण, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच जाण्याची कल्पना आल्यानंतर देवरांनी पुढचा राजकीय निर्णय घेतला.