Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
पंतप्रधान मोदींच्या संदेशाचा राजकीय आणि निवडणूक अर्थ काढला जात आहे. मुस्लीम मते थेट विरोधकांच्या बाजूने जाणार नाही, ती रोखण्याचा हा डाव आहे का? असाही प्रश्न आता समोर येतोय.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election BJP Strategy : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) आपलं लक्ष पसमांदा मुस्लिमांकडे वळवलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून भाजपच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसमांदा समाजाबद्दल भाष्य केलं. गेल्या वर्षभरापासून मोदी सातत्याने पसमांदा मुस्लिमांबद्दल बोलत आहेत. (Pasmandas Muslim : why this category of Indian Muslims has become BJP’s Main focus)
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतरच्या भाषणासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी पसमांदा मुस्लिमांचा उल्लेख केला आहे. पण पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुका आहेत आणि भोपाळमधील ज्या कार्यक्रमात पीएम मोदींनी पसमांदा मुस्लिमांचा उल्लेख केला, तो कार्यक्रमही भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शंख होता. अशा परिस्थितीत पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या हालचाली, समान नागरी कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करणे आणि तिहेरी तलाकसंदर्भातील वक्तव्याचा पंतप्रधान मोदींच्या संदेशाचा राजकीय आणि निवडणूक अर्थ काढला जात आहे. मुस्लीम मते थेट विरोधकांच्या बाजूने जाणार नाही, ती रोखण्याचा हा डाव आहे का? असाही प्रश्न आता समोर येतोय.
5 राज्यांतील 190 जागांवर लक्ष
उत्तर प्रदेश आणि बिहारसोबतच झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मुस्लिम मतदारांची संख्या बरीच मोठी आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 190 जागा याच पाच राज्यांतून येतात. यूपीमध्ये एकूण 80 पैकी 65 लोकसभेच्या जागा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 30 टक्के आहे. या जागांवर मुस्लिम मतदार विजय-पराजय ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतात. बिहारमधील 40 पैकी सुमारे 15 मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 15 ते 70 टक्के आहे.
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42, झारखंड आणि आसाममध्ये 14-14 जागा आहेत. पश्चिम बंगालमधील एकूण मतदारांपैकी सुमारे 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आसाम आणि झारखंडमधील अनेक जागांवर मुस्लिम मतदारांचीही निर्णायक भूमिका आहे. पसमांदा समाजाबद्दल बोलायचे झाले तर एकूण मुस्लिम लोकसंख्येमध्ये हा समाज 85 टक्के आहे.