‘सत्य समोर यायला हवे’, भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी मोदी सरकारला सुनावलं
दिल्लीत कुस्तीपटूंच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्य बाहेर यायला हवं होतं, असं म्हणत खासदार मुंडे यांनी भूमिक मांडली आहे.
ADVERTISEMENT

wrestlers protest latest news, MP pritam munde : दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. हे प्रकरण दिवसेंदिवस संवेदनशील बनत चाललं असून, या मुद्द्यावरून भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्य बाहेर यायला हवं होतं, असं म्हणत खासदार मुंडे यांनी भूमिक मांडली आहे. (beed mp pritam munde reaction on wrestlers protest)
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषण केले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी फोगाट भगिनी, साक्षी मलिक यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं आहे. 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेताना फरफटत नेल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या सगळ्या प्रकारावरून विरोधकांनीही मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्यानंतर आता भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी आपल्याच सरकारला आहेर दिला आहे.
प्रीतम मुंडे कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून काय म्हणाल्या?
बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे या मुद्द्यावर बोलल्या. “केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते”, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी भूमिका मांडली.
हेही वाचा >> Wrestlers Protest News : आंदोलनाची धग सचिन तेंडुलकरच्या दारापर्यंत!
“सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी”, अशा शब्दात प्रीतम मुंडेंनी सुनावलं आहे. एका भाजप खासदारांनी सरकारला सुनावलेल्या बोलांची आता चर्चा सुरू झाली आहे.










