IPL 2022 बाबत जय शाह यांनी केली अत्यंत मोठी घोषणा

IPL 2022: आयपीएलच्या यंदाच्या सीझनबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
IPL 2022 बाबत जय शाह यांनी केली अत्यंत मोठी घोषणा
15th season of ipl will start in the last week of march and will run till the end of may said jay shah(फोटो: गेटी)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 15 वा सीजन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. तसेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याचा अंतिम सामना पार पडेल. अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी आज (शनिवारी) केली आहे.

जय शाह यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'मला या गोष्टीची पुष्टी करताना आनंद होत आहे की, आयपीएलचा 15वा सीझन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि मे अखेरपर्यंत चालेल. ही स्पर्धा भारतात व्हावी, अशी इच्छा बहुतांश संघमालकांनी व्यक्त केली आहे. BCCI देखील 2022 च्या सीझनचे भारतात आयोजन करण्यास देखील उत्सुक आहे. ज्यामध्ये अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ सहभागी होतील.'

12-13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन

जय शाह म्हणाले, 'मी तुम्हाला सांगू शकतो की, आयपीएल भारतात आयोजित करण्यात यावे यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. बीसीसीआयने भूतकाळात आपल्या स्टेकहोल्डर्सच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत तडजोड केलेली नाही तसेच सोबतच प्लॅन-B वर देखील काम करेल. कारण कोव्हिड-19 ची परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे दुसरा प्लॅन देखील तयार ठेवण्यात येईल. मेगा IPL लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्यापूर्वी आम्ही व्हेन्यू निश्चित करू.'

जय शाह यांनी नमूद केलेल्या प्लॅन-बीनुसार, बीसीसीआय दक्षिण आफ्रिका, यूएई किंवा श्रीलंकेत आयपीएल आयोजित करू शकते. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता यंदा देखील भारतात कोरोनाने परिस्थिती बिघडल्यास हा सीझन या तीन देशांपैकी एका देशात खेळवला जाईल.

IPL 2022 च्या लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी 20 जानेवारीला संपली आहे. एकूण 1214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 विदेशी) लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. दोन दिवसीय मेगा लिलावात 10 संघ जागतिक क्रिकेटमधील काही सर्वोत्तम खेळाडू विकत घेण्यासाठी बोली लावतील. खेळाडूंच्या यादीत 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 असोसिएट खेळाडूंचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.