IPL 2022 : इशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबई इंडियन्सची चूक – शेन वॉटसन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा आयपीएल हंगाम अतिशय निराशाजनक जाताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचाच सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहायक प्रशिक्षक शेन वॉटसनने मुंबईच्या खराब कामगिरीचं विश्लेषण केलं आहे.

इशान किशनसारख्या खेळाडूवर 15 कोटी रक्कम खर्च करणं ही मुंबई इंडियन्सची मोठी चूक असल्याचं शेन वॉटसन म्हणाला.

MI vs LSG : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे हे पाहून मला आश्चर्य वाटत नाही. कारण त्यांनी लिलावात काही आश्चर्यकारक निवड केली आहे. इशान किशन हा एक गुणवान खेळाडू आहे यात काही शंका नाही, पण त्या खेळाडूवर लिलावात 15 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्याइतपत तो मोठा खेळाडू नाही. यानंतर मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी जवळपास 8 कोटी खर्च केले, परंतू तो यंदाचा सिझन खेळू शकणार आहे की नाही याबद्दल शाश्वती नव्हती. मुंबईच्या संघात यंदा अनेक कच्चे दुवे आहेत”, असं स्पष्टीकर शेन वॉटसनने दिलं. तो The Grade Cricketer या कार्यक्रमात बोलत होता.

IPL 2022: आयुष्य संपलेलं नाही, पुन्हा सुर्योदय होईल ! सहा पराभवांनंतर बुमराहचा आशावाद

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामासाठी रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात कायम राखलं होतं. ज्यानंतर लिलावात त्यांनी संघातील काही महत्वाच्या खेळाडूंवर बोली न लावता इशान किशनसाठी 15.25 कोटी खर्च केले. ज्यानंतर यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे खेळणार नसलेल्या जोफ्रा आर्चरवरही मुंबईने 8 कोटी रक्कम खर्च केली. ज्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबईला एकही चांगला बॉलर खरेदी करता आला नाही.

ADVERTISEMENT

यंदाच्या हंगामात मुंबईची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सकडून 4 विकेटने पराभव स्विकारत झाली. यानंतर राजस्थान, कोलकाता, RCB, पंजाब आणि लखनऊ या संघांकडूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत मुंबईचा संघ हा एकमेव संघ आहे की जो एकही सामना जिंकू शकलेला नाही. त्यामुळे आगामी काळात रोहित शर्माची टीम आपली पराभवाची शृखंला तोडू शकते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Sharma : ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो’; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

    follow whatsapp

    ADVERTISEMENT