दोन मुंबईकरांनी गाजवला पहिला दिवस, चेन्नई टेस्टवर भारताचं वर्चस्व
मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. रोहित शर्माच्या १६१ आणि अजिंक्य रहाणेच्या ६७ रन्सच्या जोरावर भारताने दिवसाअखेरीस ६ विकेट गमावत ३०० पर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने टॉस जिंकत पहिले बॅटींग करण्याचा निर्णय […]
ADVERTISEMENT

मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. रोहित शर्माच्या १६१ आणि अजिंक्य रहाणेच्या ६७ रन्सच्या जोरावर भारताने दिवसाअखेरीस ६ विकेट गमावत ३०० पर्यंत मजल मारली आहे.
दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने टॉस जिंकत पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्याकडून निराशा झाल्यानंतर सेट झालेला पुजाराही लिचच्या जाळ्यात अडकला. ३ बाद ८६ अशा अवस्थेत असताना रोहितने आपला मुंबईकर साथी अजिंक्य रहाणेच्या सोबत शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.
टेस्ट करिअरमधली रोहितची ही सातवी सेंच्युरी ठरली. एकीकडे टीम इंडियाचे इतर बॅट्समन स्पिनींग ट्रॅकवर अपयशी ठरत असताना रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे खेळ केला आणि भारतीय संघाला पुन्हा एकदा कमबॅक करुन दिलं. आता चेन्नईच्या मैदानावर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माची सेंच्युरी टीम इंडियासाठी महत्वाची का आहे याची कारणं आपण जाणून घेऊयात…
१) चांगली सुरुवात –