
मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यादरम्यान RCB च्या संघाचा खेळाडू हर्षल पटेलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं असून सामन्यादरम्यान हर्षलला ही माहिती समजली.
पुण्याच्या मैदानावर झालेल्या सामन्यात RCB ने मुंबईवर ७ विकेट राखून मात केली. हा सामना संपल्यानंतर हर्षल बायो बबल मोडून बाहेर आला आहे. तो या खडतर प्रसंगात पुढचे काही दिवस आपल्या परिवारासोबत राहणार आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात हर्षल पटेलने ४ ओव्हरमध्ये २३ रन देत २ विकेट घेतल्या.
"दुर्दैवाने हर्षलला बायो बबल सोडून बाहेर जावं लागत आहे. त्या घरात बहिणीचं निधन झालं आहे. मुंबईविरुद्ध सामना संपल्यानंतर हर्षल टीमच्या बसमधून मुंबईत न परतता थेट आपल्या घरी गेला आहे. तो घरी जाऊन १२ एप्रिलच्या आत पुन्हा बायो बबलमध्ये येईल", अशी माहिती आयपीएलच्या सूत्रांनी दिली.
RCB चा पुढचा सामना १२ एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध रंगणार आहे. हर्षल पटेलने आतापर्यंत ८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यायंमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्येही हर्षल आरसीबीच्या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.