Commonwealth Games: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! सांगलीच्या पान विक्रेत्याच्या मुलाने पटावले रौप्यपदक

मुंबई तक

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (commonwealth games 2022) भारताने पदक जिंकत आपले खाते उघडले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 किलो वजन उचलले होते. यानंतर त्याने दुसऱ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (commonwealth games 2022) भारताने पदक जिंकत आपले खाते उघडले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 किलो वजन उचलले होते. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलून पदक पटकावले.

मुळचा महाराष्ट्रातील सांगलीचा असलेल्या संकेतचा वेटलिफ्टिंगची प्रचंड आवड होती. संकेत (21) हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही तो चॅम्पियन ठरला होता. संकेतच्या नावावर 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम आहे. त्याने एकूण 244 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम केला होता.

संकेतला ऑलिम्पिकमध्ये जिंकायचंय सुवर्ण पदक

संकेतच्या वडिलांचे सांगलीत पानाचे दुकान आहे. त्याला आता आपल्या वडिलांना आरामात पहायचा आहे. संकेत नुकताच म्हणाला, ‘मी सुवर्ण जिंकले तर मी माझ्या वडिलांना मदत करेन. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आता त्यांना आनंद द्यायचा आहे. संकेतचे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp