होम ग्राऊंडवर चमकला अक्षर पटेल, इंग्लंडच्या डाव गुंडाळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपला डंका वाजवला आहे. मोटेराच्या पिचवर अक्षरने इंग्लंडला आपल्या जाळ्यात अडकवत ६ विकेट घेतल्या. अक्षरच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये ११२ रन्सवर रोखलं. २१.४ ओव्हर्समध्ये ३८ रन्स देत अक्षरने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं.

ADVERTISEMENT

डे-नाईट टेस्ट मॅचच्या इतिहासात अक्षर पटेलने टीम इंडियाकडून बॉलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

याचसोबत आपल्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये अक्षर पटेलने ५ विकेट घेण्याचा विक्रम केला. अक्षर पटेलआधी मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी या दोन भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

हे वाचलं का?

अक्षर पटेलला रविचंद्रन आश्विनने ३ विकेट्स घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने हाफ सेंच्युरी झळकावत एकाकी झुंज दिली. परंतू दुर्दैवाने इंग्लंडचा इतर कोणताही बॅट्समन अक्षर पटेलचा सामना करु शकला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT