World Championship Badminton: भारताच्या किदम्बी श्रीकांतला रौप्यपदक, सिंगापूरच्या खेळाडूने केली मात
स्पेनमध्ये पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीत सिंगापूरच्या लो केन येवने श्रीकांतवर दोन सेटमध्ये १५-२१, २०-२२ अशा सेटमध्ये मात केली. जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची झुंज सिंगापूरच्या खेळाडूपुढे तोकडी पडली. श्रीकांतला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत […]
ADVERTISEMENT
स्पेनमध्ये पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीत सिंगापूरच्या लो केन येवने श्रीकांतवर दोन सेटमध्ये १५-२१, २०-२२ अशा सेटमध्ये मात केली. जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची झुंज सिंगापूरच्या खेळाडूपुढे तोकडी पडली.
ADVERTISEMENT
श्रीकांतला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये श्रीकांत आणि लो केन येव समोरासमोर आले होते, ज्यात श्रीकांतने लो केन येव वर मात केली होती. परंतू आज झालेल्या सामन्यात अवघ्या ४२ मिनीटांमध्ये सिंगापूरी खेळाडूने बाजी मारली.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतने उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनवर मात केली होती. सिंगापूरी खेळाडूविरुद्ध पहिल्या सेटमध्ये श्रीकांतचा फारसा निभाव लागला नाही. लो केन येवने आक्रमण आणि बचावाचं उत्तम प्रदर्शन करत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. परंतू दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने लो केन येवला चांगलंच झुंजवलं.
हे वाचलं का?
अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये अवघ्या काही गुणांचं अंतर होतं. परंतू मोक्याच्या क्षणी नेटच्या जवळ फटके खेळत असताना श्रीकांतने केलेली घाई त्याला चांगलीच महागात पडली. ज्याचा फायदा घेत सिंगापूरी खेळाडूने सामन्यात बाजी मारत विजेतेपदावर मोहर उमटवली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणारा श्रीकांत हा चौथा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी प्रकाश पदुकोण यांनी १९८३ मध्ये, बी. साई प्रणितने २०१९ मध्ये तर लक्ष्य सेनने यंदाच्या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT