सुनिल गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाची पन्नाशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. जवळपास सत्तरच्या दशकातील सुरुवातील सुनिल गावस्कर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मैदानावर उतरले होते. दरम्यान आज भारत विरूद्ध इंग्लंडमधील अहमदाबाद कसोटीच्या निमित्ताने गावस्कर यांना गौरवण्यात आलं.

ADVERTISEMENT

यावेळी बीसीसीआयच्या वतीने सुनिल गावस्कर यांचा स्मृतचिन्ह देऊन सन्मानंही करण्यात आला. बीबीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते सुनिल गावस्कर यांचा खास ‘इंडिया कॅप’ देत सन्मान केला गेला. गावस्कर यांना देण्यात आलेल्या या कॅपवर 6 मार्च 1971 अशी तारिख लिहिण्यात आली आहे. गावस्कर यांनी याच दिवशी दिवशी वेस्ट इंडिज विरूद्ध कसोटी खेळून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

यासंदर्भात बीसीसीआयने खास ट्विटंही केलंय. आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसंच दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाची 50 वर्षे साजरी करतायत, असं बीसीसीआयने म्हटलंय.

हे वाचलं का?

या खास दिवशी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही ट्विटरवरून पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्या आयडॉलसाठी एक ट्रिब्यूट!’ असं कॅप्शन देत सचिनने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने गावस्करांसाठी खास संदेश लिहिला. क्रिकेटचा देव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या तेंडुलकरने त्यांचे अभिनंदन केलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT