GT vs SRH : हैदराबादविरूद्ध सामन्यात गुजरातने जर्सी का बदलली? काय आहे कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

gujarat titans wear special jersey against sunrisers hyderabad
gujarat titans wear special jersey against sunrisers hyderabad
social share
google news

Gujarat Titans wear Special Jersey Against Sunrisers Hyderabad : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबादमध्ये 62 वा सामना खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातच्या जर्सीन सगळ्यांच लक्ष वेधुन घेतले आहे. गुजरात संघ लव्हेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. मात्र अचानक गुजरात संघाने जर्सीचा रंग का बदललाय असा प्रश्न आता उपस्थित होतोय़? खरं तर अशाप्रकारची जर्सी घालून गुजरातने जनजागृती केली आहे. त्यामुळे नेमके गुजरातने जर्सी का बदलली आहे? आणि नेमकी कोणती जनजागृती सुरू आहे? हे जाणून घेऊयात. (Gujarat Titans wear Special Jersey Against Sunrisers Hyderabad to spread Awareness about cancer)

ADVERTISEMENT

जर्सीच्या माध्यमातून जनजागृती

गुजरात टायटन्सने काही दिवसांपूर्वीच सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी विशेष लॅव्हेंडर जर्सीचे अनावरण केले होते. आणि आज ही लॅव्हेंडर कलरची जर्सी परीधान करून गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरले होते. खरं तर कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी गुजरात टायटन्सने विशेष जर्सी परिधाण केली होती. गुजरातच्या खेळाडूंनी कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आजच्या सामन्यात नियमित जर्सीऐवजी लॅव्हेंडर कलरची जर्सी घातली आहे.

हे ही वाचा : ‘वर्ल्ड क्रिकेटमध्ये फलंदाज…’, सचिनने केले सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ सिक्सचे कौतूक

दरम्यान याआधी 2015 च्या आयपीएल हंगामात देखील अशीच जनजागृती करण्यात आली होती. दिल्ली कॅपिटल्सने युवराज सिंगच्या YouWeCan संस्थेशी करार केला होता. दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून वाचला होता. यावेळी देखील कॅन्सरविरुद्ध जनजागृती करण्यात आली होती.

हे वाचलं का?

असा रंगला सामना

सनरायझर्स हैदराबाद संघाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय़ घेतला होता.त्यामुळे गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीला उतरली होती. गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही, कारण सलामीवीर रिद्धीमान साह शुन्य धावावर बाद झाला. यानंतर मैदानात उतरलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिलने संपूर्ण डाव सावरत संघाला यथोचित स्थानी पोहोचवलं. साई सुदर्शनचे अर्धशतक हुकले. तो 47 धावा करून बाद झाला. साई सुदर्शनच्या विकेटनंतर एकामागो माग विकेटची रांगच लागली होती. मात्र शुबमन गिल एका बाजूने भक्कमपणे डाव सावरून होता. शुबमन गिलने आपले शतक पुर्ण केले आणि तो देखील बाद झाला.शुबमन गिलने 58 ब़ॉलमध्ये 101 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. या खेळीच्या बळावर गुजरातने 188 धावा ठोकल्या आहेत. आता हैगराबादसमोर 189 धावांचे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा : “धोनी RCB चा कर्णधार असता, तर तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती”, वसीम अक्रम असं का म्हणाला?

हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने उत्कृष्ट गोलंदाजी केली. भुवनेश्वरने या सामन्यात 30 धावा देऊन 5 विकेट काढले. यामधील 4 विकेटने त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. विशेष म्हणजे गुजरात संघ 250 धावांचा पल्ला गाठेल असा अंदाज होता,मात्र हैदराबादच्या बॉलर्सनी पुनरागमन करत 188 धावात गुजरातला रोखले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT