Hardik Pandya IPL 2024 : हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने सोडला 17.50 कोटींचा खेळाडू, कारण…

भागवत हिरेकर

Hardik Pandya traded to Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला विकत घेतले आहे. त्यासाठी मुंबईने ग्रीनला 17.50 कोटी रुपयांत आरसीबीला विकले आहे. पण, मुंबईने हा व्यवहार का केला?

ADVERTISEMENT

Hardik Pandya traded to Mumbai Indians
Hardik Pandya traded to Mumbai Indians
social share
google news

Gujarat Titans trade Hardik Pandya to Mumbai Indians, IPL Transfer Window 2024 : आयपीएलच्या 2024 मधील हंगामापूर्वी दुबईत लिलाव होणार आहे. त्यापूर्वीच आयपीएलच्या ट्रेड विंडो माध्यमातून मुंबई इंडियन्सने मोठी खरेदी केली. गुजरात टायटन्सने रिटेन केलेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत सर्वांना धक्का दिला. हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने आपला 17.50 कोटींचा खेळाडू रिलीज केला. त्यामुळे मुंबईला हार्दिक मुंबईला का हवाय, याबद्दल नवी माहिती समोर आलीये. (How did Hardik Pandya reach Mumbai Indians, Know the inside story of the deal with gujarat titans)

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने टाकलेला डाव यशस्वी ठरला. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून थेट 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या टीम मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. 2024 च्या हंगामापूर्वी पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन वेळा कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने एकदा संघाला आयपीएलची ट्रॉफीही जिंकून दिली होती. तर त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात एकदा उपविजेता राहिला होता.

आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीने राखून ठेवलेली आणि जाहीर केलेली यादी जाहीर केली. दरम्यान, गुजरात टायटन्सने ही यादी जाहीर करताच हार्दिकला रिटेन केल्याचे पाहून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, त्यानंतर दोन तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आणि पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला. मात्र, हा करार कसा झाला आणि मुंबईने हार्दिकला का घेतलं, याबद्दलची इनसाईड स्टोरी घेऊयात…

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये… कराराची आतली कहाणी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला संघात आणण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेतला. त्यांनी कॅमेरून ग्रीनची व्यवहार केला. कॅमेरून ग्रीनचा मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी 17.50 कोटी रुपयांमध्ये व्यवहार केला आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp