World Cup 2023 :…तर भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ ठरणार विश्व विजेते!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs aus final world cup 2023 narendra modi stadium if rain spoil match then what was the result india vs australia
ind vs aus final world cup 2023 narendra modi stadium if rain spoil match then what was the result india vs australia
social share
google news

India vs Australia Final, World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 19 नोव्हेंबर 2023 (रविवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारत तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर या सामन्याचा निकाल कसा लागणार? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे.(ind vs aus final world cup 2023 narendra modi stadium if rain spoil match then what was the result india vs australia)

ADVERTISEMENT

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता तशी कमीच आहे, त्यामुळे ही क्रिकेट फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. मात्र तरीही हवामानाने दगा करून पावसाची एन्ट्री झाल्यास सामन्यासाठी राखीव दिवसाचा पर्याय आहे. पण जर राखीव दिवशी पाऊस पडून सामना रद्द झाल्यास काय? असा प्रश्न आता क्रिकेट फॅन्सना पडला आहे.

हे ही वाचा : Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

रिझर्व्ह डेला पाऊस पडला तर…

जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पुर्ण होऊच शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल, असे आयसीसीने सांगितले आहे. याआधी 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान असा प्रकार घडला होता. त्यावेळी भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते. तसेच 48 वर्षांच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही फायनल सामना राखीव दिवसापर्यंत गेला नाही.ठरलेल्या दिवशीच हे सामने पार पडले आहेत.

हे वाचलं का?

रिझर्व्ह डे कधी लागू होतो?

किती पाऊस पडला आणि सामना थांबला तर अंपायर्स त्याच दिवशी अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत असतात. यासाठी हा सामना किमान 20 ओव्हरचा तरी खेळता येईल असा प्रयत्न अंपायर्सचा असतो. पण जर तितक्याही ओव्हरचा सामना खेळवता येत नसेल तर तो राखीव दिवसावर ढकलला जातो. राखीव दिवसातही किमान 20-20 ओव्हर खेळणे आवश्यक आहे. पण पावसामुळे त्या दिवशी खेळ होऊच शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

हे ही वाचा : Pankaja Munde : ‘…म्हणून ओबीसी मेळाव्याला गेले नाही’; पंकजा मुंडेंनी केला खुलासा

सामना बरोबरीत सुटला तर…

जर वर्ल्ड कपचा अंतिम सामना बरोबरीत सुटला तर त्यात सुपर ओव्हर घेण्यात येते. जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर अशावेळी पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात येते. जिथपर्यंत एक संघ जिंकत नाही, तिथपर्यंत सुपर ओव्हर चालूच राहतात. अशाप्रकारे अंतिम सामना बरोबरीत सुटला तर चाहत्यांना दुप्पट थरार पाहण्याची संधी मिळणार आहे.

ADVERTISEMENT

आता या वर्ल्ड कप सामन्यात भारत तिसऱ्यांदा की ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT