IND vs AUS: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया मालिका टीम इंडियासाठी ठरणार लिटमस टेस्ट?
टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला असून शेवटची तयारी आता सुरु झाली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात दोन मोठ्या टी-20 मालिका खेळायच्या आहेत. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे ही सिरीज भारतीय संघासाठी लिटमस टेस्ट असणार आहे, या सिरीजमधून संघ व्यवस्थापनाला अनेक प्रश्नांची […]
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला असून शेवटची तयारी आता सुरु झाली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात दोन मोठ्या टी-20 मालिका खेळायच्या आहेत. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे ही सिरीज भारतीय संघासाठी लिटमस टेस्ट असणार आहे, या सिरीजमधून संघ व्यवस्थापनाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
विश्वचषकात ओपनींग कोण करणार?
टीम इंडियाने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळण्याची शैली बदलली आहे. गेल्या काही काळात बरेच प्रयोग केले गेले आहेत. दरम्यान, टीम इंडियासमोर ओपनिंग कोण करणार हा प्रश्न आहे. विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी, अशी मागणी अनेक तज्ज्ञांनी केली आहे. मात्र, केएल राहुलच ओपनिंग करणार असल्याचे कर्णधार रोहितने स्पष्ट केले आहे. पण विराट काही सामन्यांमध्ये सलामीही करू शकतो. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका मालिकेत वेगवेगळे पर्याय पाहायला मिळू शकतात.
फिनिशरची भूमिका कोण निभावणार?
भारताकडे 6-7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकसारखे पर्याय आहेत. हे दोघेही सामना संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आयपीएल 2022 नंतर, दिनेश कार्तिक एक फिनिशर म्हणून उदयास आला आहे. पण अनेकवेळा त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालेले नाही. मात्र टी-20 विश्वचषकापूर्वी दिनेश कार्तिक कसा फिट बसतो हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागेल.
हे वाचलं का?
रवींद्र जडेजाची जागा कोण घेणार?
स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याची जागी कोण येणार? हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे, पण प्रत्येक सामन्यात चार षटके टाकता येणार नाही कारण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत अक्षर पटेल नियमित संघासोबत प्लेइंग-11 मध्ये सामील होऊ शकेल का? जो संघासाठी काही षटके टाकू शकतो आणि झटपट धावा देखील काढू शकतो. कर्णधार रोहित शर्मा येथे फक्त दीपक हुडाला संधी देण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंत की दिनेश कार्तिक?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्लेइंग-11 मध्ये कोणाचा समावेश होणार, दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? रोहित शर्मा दोन्ही खेळाडूंना खेळायला देईल की फक्त दिनेश कार्तिकलाच संधी मिळेल. कारण ऋषभ पंतची टी-20 फॉरमॅटमध्ये कामगिरी अशी नाही की तो सातत्याने प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवू शकेल. याचा संघाच्या संयोजनावरही परिणाम होतो, ऋषभच्या बाजूने, तो डावखुरा आहे आणि संघाकडे सध्या असा एकही फलंदाज नाही.
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
ADVERTISEMENT
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (wk), दिनेश कार्तिक (wk), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT