दोन मुंबईकरांनी गाजवला पहिला दिवस, चेन्नई टेस्टवर भारताचं वर्चस्व

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. रोहित शर्माच्या १६१ आणि अजिंक्य रहाणेच्या ६७ रन्सच्या जोरावर भारताने दिवसाअखेरीस ६ विकेट गमावत ३०० पर्यंत मजल मारली आहे.

दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने टॉस जिंकत पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्याकडून निराशा झाल्यानंतर सेट झालेला पुजाराही लिचच्या जाळ्यात अडकला. ३ बाद ८६ अशा अवस्थेत असताना रोहितने आपला मुंबईकर साथी अजिंक्य रहाणेच्या सोबत शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.

टेस्ट करिअरमधली रोहितची ही सातवी सेंच्युरी ठरली. एकीकडे टीम इंडियाचे इतर बॅट्समन स्पिनींग ट्रॅकवर अपयशी ठरत असताना रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे खेळ केला आणि भारतीय संघाला पुन्हा एकदा कमबॅक करुन दिलं. आता चेन्नईच्या मैदानावर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माची सेंच्युरी टीम इंडियासाठी महत्वाची का आहे याची कारणं आपण जाणून घेऊयात…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) चांगली सुरुवात –

विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. पण दुर्देवाने भारताची सुरुवात खराब झाली. आतापर्यंत प्रॉमिसींग खेळणारा गिल या टेस्टमध्ये ओली स्टोनच्या बॉलिंगवर आऊट झाला. पुजारा आणि रोहितने मध्ये डाव सावरला…पण लागोपाठ दोन विकेट घेत इंग्लंडने भारताला बॅकफूटला ढकललं. अशावेळी इतिहास पाहता भारताच्या बॅट्समननी हाराकिरी करण्याचे खूप चान्सेस होते.

ADVERTISEMENT

पण अनपेक्षितरीत्या रोहित आणि अजिंक्यने इंग्लंडच्या बॉलर्सना थकवलं. रोहित एका बाजूला फटकेबाजी करत होताच पण जिकडे डिफेन्स करणं गरजेचं होतं तिकडेही रोहितने चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं. ज्याचा फायदा असा झाला की दोन्ही प्लेअर्सना मैदानावर आपला जम बसवण्याची संधी मिळाली आणि टीम इंडियाने कमबॅक केलं.

ADVERTISEMENT

२) मित्रासोबत खेळताना अजिंक्यलाही सूर गवसला –

रोहित शर्माला पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेनेही चांगली साथ दिली. अजिंक्यबद्दल फॅन्सना म्हणा किंवा माजी खेळाडूंना काय आक्षेप होता की अजिंक्यच्या खेळात सातत्य दिसत नाही. म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावल्यानंतर अजिंक्यचा खेळ खालावत गेला. चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या टेस्टमध्येही अजिंक्य १ आणि ० असा स्कोअर करु शकला. अशा परिस्थितीत इंडियन पीचवर अजिंक्यचं अपयशी होणं संघासाठी चिंताजनक ठरत होतं.

पण मुंबईचा आपला मित्र एकीकडे धडाकेबाज खेळी करत असताना पाहून अजिंक्यलाही स्फुरण चढलं आणि त्यानेही इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई करायला सुरुवात केली. या दोन्ही मुंबईकरांनी मिळून इंग्लंडच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणले.

अखेरीस १६१ रन्स काढल्यानंतर रोहित जॅक लिचच्या बॉलिंगवर आऊट झाला. रहाणे आणि शर्मा या मुंबईकर जोडीने चौथ्या विकेटसाठी १६२ रन्सची पार्टनरशीप करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणेही फारकाळ टीकला नाही. ६७ रन्सवर मोईन अलीले रहाणेला क्लिन बोल्ड केलं. यानंतर रविचंद्रन आश्विन आणि पंत यांनी पुन्हा फटकेबाजी करुन आपलं दिवसाअखेरीस सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT